नाशिक येथे ब्लू बर्ड ॲप चे लॉन्चिंग चॅप्टर मोठ्या उत्साहात पार पडले.

0
114

अश्विनी कोटमे
जिल्हा प्रतिनिधी
नाशिक

नाशिक १० मे २०२३ रोजी नाशिक येथे हॉटेल सेव्हन हेवन मध्ये आयोजित ब्लू बर्ड ॲप चे लॉन्चिंग चॅप्टर मोठ्या उत्साहात पार पडले. ब्लू बर्ड समूह, नागपूर यांच्या सौजण्याने बुद्धिस्ट समाजातील व्यावसायिक आणि ग्राहक यांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी हे ॲप समाजासाठी समर्पित आहे. बुद्धिस्ट व्यावसायिक आणि यांच्यातील दुवा बनण्याचे काम या ॲप मार्फत करण्यात येणार आहे. समाजाने व्यवसाय क्षेत्रात आपला नावलौकिक मिळवावा, ग्राहक वर्ग तयार करता यावा, समाजातील व्यावसायिक यांना प्रोत्साहन मिळावे, संधी उपलब्ध व्हाव्यात, समाजबांधवांची एकमेकांना व्यवसाय वृध्दी होण्यासाठी मदत व्हावी म्हणून सतत या समूह आणि ॲप द्वारे विविध उपक्रम आणि प्रयत्न राबविले जातात. ब्लू बर्ड समूह यासाठी दरवर्षी सोशल डे (आंबेडकरी समाजातील सर्व नगर आणि वस्त्यांवर) घरोघरी जाऊन व्यावसायिक आणि ॲप बद्दल जनजागृती करणे, लिटिल बिजणेस चॅम्प या उपक्रमा द्वारे समाजातील लहान वयोगटातील मुलांना व्यवासाय संबंधी माहिती तसेच माहिती देण्यासाठी रहिवाशी कॅम्प उभारणे, प्रत्येक जिल्ह्यात ब्लू बर्डचा प्रसार आणि प्रचार करणे, त्या संबंधी कार्यक्रम आयोजित करणे इत्यादी कार्य करत आहे.
नाशिक येथील कार्यक्रमांत ब्लू बर्ड नागपूर आणि नाशिक समूहाचा परिचय मेळावा संपन्न झाला. ब्लू बर्ड मुख्य नागपूर टीम तर्फे अध्यक्ष रणजित फुले
, सचिव मिथिलेश पाटील इतर सर्व उपस्थित होते. ब्लू बर्ड नाशिक साठी कार्यकारिणी जाहीर करून त्यामध्ये दीपक मकासरे यांना अध्यक्ष पद देण्यात आले . दीपक मकासरे हे स्वतः व्यावसायिक असून त्यांचा man power services आणि हाऊस किपिंग सर्व्हिसेसचा व्यवसाय संपूर्ण भारतात आहे. उपाध्यक्ष पद हे अमित गरुड यांना जाहीर केले, त्यांचा इन्शुरन्स सर्व्हिसेस संबंधी व्यवसाय आहे . कोषाध्यक्ष पद सौ.मिरा पगारे यांना जाहीर करण्यात आले. त्या एक इन्शुरन्स आणि इंव्हेस्टमेंट सर्व्हिस प्रोवाईडर आहेत. कार्यक्रम आयोजनात LKP सिक्युरिटीज चे Vice president विश्वनाथ बोदोडे, नाशिक यांचे विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऍड. त्रिरत्ना बागुल – पुणे आणि अमित गरुड – नाशिक यांनी केले.
समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी ही एक क्रांती मानण्यात येऊन समाजाद्वारे त्याचे स्वागत होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here