
स्वप्निल मोहितकर
तालुका प्रतिनिधि
प्रबोधिनी न्युज भद्रावती
नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ विरूर (स्टे) द्वारा संचालित छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय कोंढा येथे १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुंभारे मॅडम यांनी जीवनात योगाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले.
सकाळी 7.00 वाजता विद्यालयात अजय विधाते सर यांनी योगासनाचे प्रात्यक्षिक करवून घेतले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विविध योगासने केली.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कुंभारे, कवीश्वर शेंडे, अजय विधाते, सुधीर आगलावे, वनिता तितरे, उर्मिला निखाडे, देवराव ढवस, गगणेश चिकटे, संबाजी देवगडे हे उपस्थित होते.














