घरावरून गेलेल्या विद्युत तारांची उपाययोजना करून वारंवार खंडीत होणारा विजपुरवठा तात्काळ सुरळीत करा

0
96

मनसेचे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार आणि मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे यांची आमदार तथा महवितरणच्या मुख्य अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

महाकाली कालरी चंद्रपूर परिसरातील प्रकाश नगर येथील विजपुरवठा वांरवार खंडीत होत असून सामान्य माणसाला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच या परीसरातील विजेचे तार कमकुवत झाले असून अगदी खाली आले आहेत यामुळे या तारांना स्पर्श होऊन जीवीतहानी सूद्धा होण्याची दाट शक्यता आहे त्यामूळे जनजीवन भयभीत झाले. असून वारंवार खंडीत होणाऱ्या विजपुरवठ्यामूळे शालेय विद्यार्थी छोटे व्यवसाहिक यांना याचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे तेव्हा आपण आपल्या स्तरावर योग्य ती चौकशी करून सदर परीसरातील वारंवार खंडीत होणारा विजपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याच्या सूचना संबधीत विभागाला देऊन येथील नागरींकाना दिलासा द्यावा.

या विषयांचे निवेदन मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार तथा मनविसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे व रुग्णमित्र क्रिष्णा गुप्ता यांच्या कडून आज प्रकाश नगर इथे घरावर मोठे माणसे असो की लहान मूल कोणास जीवित हानी नाही झाली पायजेल असे आश्वासन घेण्यात आले अणि समंधित अधिकाऱ्याना सांगण्यात आले अशे आज दिनांक २१/०६/२०२४ रोजी शुक्रवारला आ. किशोर जोरगेवार तथा महावितरणच्या मुख्य अभियंत्याला देण्यात आले तेव्हा सदर मागणीचे गार्भीर्य लक्षात घेता आमदार महोदय यांनी संबधीत विभागाला भ्रमणध्वनी ने सूचना दिल्या आणि महावितरणचे मूख्य अभियंता साहेब यांनी तात्काळ दखल घेत संबधीत कर्मचार्यांना महाकाली कॉलरी तील प्रकाश नगर अणि इतर वार्ड परीसरातील विजेचे काम करण्यास सांगितले सदर विजेचे काम पूर्णत्वास आले असून येथील नागरीकांना दिलासा मिळाला आहे मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार हे नेहमी समाजकार्यात अग्रेसर असून वेळोवेळी समाजहिताचे कार्य करीत असतात या कार्याने त्यांचे परीसरातील नागरीकांकडून कौतूक केले जात आहे.. निवेदन देणार्या शिष्टमंडळात जिल्हा उपाध्यक्ष मनविसे कुलदिप चंदनखेडे रूग्ण मित्र क्रिष्णा गुप्ता मनविसे ता, उपाध्यक्ष प्रविन शेवते आणि मनसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here