माझ्या रमाई, भिमाची जोड
साऱ्या जगात, नाही हो तोड
या नात्याचा जगी असा नजारा
जसा हा सागर आणि किणारा
भीम संजीवनी, प्रेम संजीवनी
भीम संजीवनी, प्रेम संजीवनी llध्रुll
भीम संजीवनी……..
पाहून रमाचं, रूप हे प्यार
आनंदला भीमा मनी फार
लाजली हासली पदराचा भार
मेहंदी गजरा पिर्तीच सारं
नवरी लाखात सुंदर नार
रमाई आधार भीमाच्या जिवणी ll१ll
भीम संजीवनी……..
प्रेम होत दोघात जीवापाड
जस नयनी अश्रू समान
जुळले भिमाचे ऋणानु बंध
खनखणले कंगण, पैंजणं
भीमस्पर्शान पावन रमाई
समर्पित झाली भीमचरणी ll२ll
भीम संजीवनी…….
शोभे हि सुभेदाराची सून
लखलखला वाडा रमा पावलानं
संस्कारी शिलाचे उधळी सुगन्ध
अमृतवाणीचा शिडकाव करून
जिंकलं रमाईनं भीम हृदय
दिल भाग्यचं देण (दान) भीमानी ll३ll
भीम संजीवनी……
कवी- सोमनाथ पगार
(सॅप), नाशिक

