शारदा भुयार
जिल्हा प्रतिनिधी
वाशीम
कारंजा (लाड) : सातत्याने पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास,उन्हाळ्याच्या दिवसात होणारा प्रचंड उष्णतेचा प्रकोप आणि दुष्काळी परिस्थिती बघून दुःखी होत कारंजा येथील पोलीस कर्मचारी सुरज खडके यांनी मानवसेवेसाठी खारीचा वाटा उचलण्याच्या उदात्त हेतूने आणि आपल्यातील सुप्त अशा भावनांना मोकळी वाट देत, जास्तित जास्त वृक्षारोपण करण्याचा संकल्प करून,गेल्या वर्षभरात स्वत: काही झाडांची रोपे तयार करून,कारंजा येथील पर्यावरण प्रेमी मित्रांना एकत्र करून त्यांना आपण स्वतः तयार केलेल्या विविध झाडांची रोपे भेट देण्याचे ठरवीले आहे.त्याकरीता त्यांनी उद्या मंगळवार दि. 25 जून 2024 रोजी सकाळी 09:00 वाजता कारंजा बायपास येथील क्रिडा संकुल कारंजा येथे छोटेखानी वृक्ष वितरण कार्यक्रम करण्याचे ठरवीला आहे.तरी वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करू इच्छिणाऱ्या पर्यावरण प्रेमींनी वृक्षाचे रोपे घेण्या करीता उपस्थित राहण्याचे आवाहन स्वतः पोलीस कर्मचारी सुरज खडके यांनी केले असल्याचे महाराष्ट्र हरितसेना सदस्य संजय कडोळे यांनी कळवीले आहे.

