वंचितने आयोजीत केलेल्या शाहू महाराज महोत्सव व्याख्यानात डॉ सविता मादमवार यांचे प्रतिपादन !
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
गडचिरोली – जे जे मनुष्य समताधिष्ठीत समाज निर्मीतीच्या विचाराचे आहेत त्या प्रत्येकांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजानी दिलेल्या आरक्षणाचे रक्षण केले पाहिजे असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापिठातील सहाय्यक प्रा डॉ सविता सादमवार यांनी केले.
वंचित बहुजन आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या वतिने छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती महोत्सवानिमीत्य पत्रकार भवन येथे आयोजीत प्रबोधनात्मक व्याख्यान प्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ सादमवार बोलत होत्या.
या प्रबोधनात्मक व्याख्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे होते तर या प्रसंगी सेवानिवृत्त प्राचार्य मुनिश्वर बोरकर, बाल वक्ता प्रसाद प्रल्हाद मशाखेत्री, वंचित महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञा निमगडे, माला भजगवळी, महासचिव योगेंद्र बांगरे, जी के बारसिंगे, विलास केळझरकर, तुळशिराम हजारे आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुढे बोलतांना डॉ सादमवार म्हणाल्या की, आपल्याला जे काही वैभव प्राप्त झाले आहे ते समाज परिवर्तानासाठी झटणा-या संत महापुरूषांची देणगी आहे. म्हणून शाहू महाराजानी केलेले कार्य आपण अंगिकारून पुढच्या पिढीची सुरक्षितता कायम केली पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
यावेळी या व्याख्यान परिषदेत कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांनी आरक्षणाच्या संदर्भातील विविध ठराव वाचन करून उपस्थितांच्या एकमताने ठराव पारित करून घेतले.
यावेळी उपस्थित पाहुणे मुनिश्वर बोरकर, जी के बारसिंगे, प्रज्ञा निमगडे यांनीही मनोगत व्यक्त केले. व बाल वक्ता प्रसाद मशाखेत्री यांनी महापुरुषांच्या ओजस्वी विचाराच्या संवादानी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन योगेंद्र बांगरे यांनी तर प्रास्ताविक भिमराव शेंडे तर आभार माला भजगवळी यांनी मानले. या व्याख्यान कार्यक्रमाला शहरवासियांची मोठी उपस्थिती होती.

