कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
ब्रम्हपूरी येथील सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पुष्पाकर बांगरे यांनी नुकताच काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार व गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे.
ब्रम्हपूरी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विविध विकासकामे सुरू असुन ब्रम्हपुरीची वाटचाल विकासाच्या दिशेने सुरू आहे. येत्या काळात विकसित शहर म्हणून ब्रम्हपूरी पुढे येणार आहे. हे सर्व राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नामुळे होत आहे.
त्यामुळे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांनी केलेल्या विकासकामांवर व त्यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून ब्रम्हपूरी
येथील सुर्वणकार समाजाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पुष्पाकर बांगरे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्या प्रमुख उपस्थितीत काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे पक्ष प्रवेश पार पडला.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, न.प. माजी बांधकाम सभापती विलास विखार, माजी नगरसेवक डॉ.नीतीन उराडे, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे, न.प. माजी उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष मोहसीन कुरेशी, नरेंद्र गाडगीलवार यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

