उदगीर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पिकविमा मिळवून देणारच

0
125

तालुक्यातील सर्व चेअरमनची तहसीलदार यांना निवेदन..

बळीराम लांडगे तालुका प्रतिनिधी,उदगीर – दि-१५ (सोमवार) रोजी उदगीर तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमननी मिळून खरीप हंगाम २०२३ मधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विमा का मिळाला नाही?तो विमा केव्हा मिळणार?असे प्रश्न तहसील कार्यालय उदगीर येथे उपस्थित केले.
तालुका कृषी अधिकारी यांच्या अहवालानुसार खरीप २०२३ मध्ये उदगीर तालुक्यातील सोयाबीन पिकाचे ८०% नुकसान झाले होते.तर त्यावर्षी तालुक्यातील १ लाख ६ हजार ५६९ शेतकऱ्यांनी पिकविम्यासाठी अर्ज केला होता.त्या सर्व १,०६,५६९ शेतकऱ्यांना विमा का मिळाला नाही अशी माहिती विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींना फोन करुन विचारल्यानंतर त्यांच्याकडून टाळाटाळ करण्यात आली.
त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मंत्री ना.संजय बनसोडे यांच्या कार्यालयात पत्र देऊन मंत्रिमहोदयांनी विमा कंपनीचे प्रतिनिधी,तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व संबंधित सर्व विभागाचे अधिकारी यांची बैठक सर्व चेअरमन आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी यांच्यासोबत दि.२० जुलै,शनिवार रोजी आयोजित करण्याची विनंती केली आहे.
उदगीर तालुक्यातील सर्व शेतकरी खरीप-२०२३ च्या विम्यास पात्र असून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना विमा मिळालाच पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळात मोठे आंदोलन उभे करुन सनदशीर मार्गाने विमा कंपनीच्या विरोधात सर्व शेतकऱ्यांना घेऊन कोर्टात जाणार असल्याची माहिती गंगापूर सहकारी संस्थेचे युवा चेअरमन विवेक पंडितराव जाधव यांनी दिली.
यावेळी तोंडचीरचे चेअरमन शिवाजी पाटील,हेरचे चेअरमन संगमेश्वर मिटकरी,करडखेलचे चेअरमन शिवाजी निडवंचे,चिघळी चेअरमन शिवराज पाटील,लोहारचे चेअरमन शेषराव हेळगे,करवंदी चेअरमन पप्पु गंभीरे,वाढवणा चेअरमन ज्ञानेश्वर भांगे,कल्लूर चेअरमन श्रीरंग कुंडगीर,मन्ना उमरगा चेअरमन वैजनाथ केसगिरे,कौळखेड चेअरमन मन्मथ कोनमारे,कुमदाळ चेअरमन वीरभद्र पाटील,नागलगाव चेअरमन कलप्पा पाटील यांच्या समवेत इतर चेअरमन,संचालक,शेतकरी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here