प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चंद्रपुर :- वंदनीय हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने आणि शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष मा. लक्ष्मण (भाई) जनार्दन तांडेल यांच्या कामगारांना न्याय हक्क मिळवून देवून जास्तीत जास्त सभासद बनविण्याचे निर्देशानुसार आंबेडकर चौक, दुर्गापुर येथे किटाळी ऑटो स्टैंड शाखेचे उदघाटन करण्यात आले.
सदर ऑटो स्टैंड शाखेचे उदघाटन शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी व वाहतुक जिल्हाध्यक्ष अरविंद धिमान यांच्या हस्ते करुन उपस्थितांना मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी वाहतुक चंद्रपुर तालुका उपाध्यक्ष विक्की महाजन, रिजवान कुरैशी, किटाळी ऑटो स्टैंड शाखेचे अध्यक्ष अनिल उपरे, दयानंद चुनारकर, प्रकाश आसुटकर, रामेश्वर रायपुरे, अनिल रत्नपारखी, उत्तम चुनारकर, अनिल देवगड़े, सुरेश मेश्राम, सुरेश खोब्रागडे, पुरुषोत्तम बावणे, राजेश खांडेकर, मनोज तांडेकर, संतोष आंबिलकर उपस्थित होते .

