शतकानुशतके शोषणाच्या बळी
पडलेल्या जीवांना
मुक्त होण्याची तू दिलीस हाक
तू होतास डोळस मार्ग दाता
तू समजून घेतल्यास
दलीत, आदिवासी, शोषित पीडित सर्वहारा माणसाच्या व्यथा
अणि सर्सावलास अंधारमय जगाला प्रकाशमय करण्यासाठी
तुला माहित होते
गुलामांना गुलामीची जान करुन दिल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही म्हणून
तू गळगळलास निळ्या आसमंतात ढग गळगलावे तसे
अणि उटून उभे केलेस गुलाम झालेल्या मेंदूना क्रांतीपथावर
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा
हा क्रांती नारा
पेठवत गेला गुलामांच्या मेंदू मेंदुना
पेठलेले मेंदू संघटित होऊन
लढू लागेल अपाल्या हक्कासाठी
चवदार तळ्याचे पाणी टाकलेस
अस्पृश्य माणसाचे ओंजळीत
अणि कित्येक काळ घोटभर पाण्यासाठी
तहानलेले मानवी जीव तहान मुक्त केलेस
चवदार तळे महान केलेस
तुझ्या महान स्पर्शाने
पुरोहित भटांच्या जेलमध्ये बंदिस्त असलेले काळे राम मंदिर मुक्त करून काळया रामालाही तू स्वातंत्र्य देउन मोकळे केलेस
अणि काळा राम धन्य झाला
स्त्रियांच्या हक्काचे हिंदू कोडबिल मांडून तूने स्त्रीला समानतेचा हक्क दिला
मनुवादीचा विषमतावादी मनु तूने
समतेने गारद केला
दिलीस आम्हा मुक्ती तूम्ही
दिलास मुक्तीचा महा मंत्र
युगा युगाची गुलामी मोडून
केलीस आम्हा स्वतंत्र ……
कवियत्री मनीषा तिरणकर
यवतमाळ

