prabodhini news logo
Home ठळक बातम्या तिरंगा झेंड्याचा अवमान केल्याप्रकरणी बडतर्फीची व अपात्रतेची कारवाई करा – रोहन राजेशिर्के

तिरंगा झेंड्याचा अवमान केल्याप्रकरणी बडतर्फीची व अपात्रतेची कारवाई करा – रोहन राजेशिर्के

0
197

सातारा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – सातारा – 1 मे 2024 रोजी मौजे राजापुरी तालुका जिल्हा सातारा येथे ध्वजारोहणाचा विसर पडणाऱ्या ग्रामसेवक सरपंच ,उपसरपंच यांच्यावरती बडतर्फीची कारवाई करण्याबाबत पत्र दिनांक 05/07/2024 रोजी सातारा पंचायत समिती चे गटविकास अधिकारी सो. सतीश बुद्धे यांना दिले होते. त्यांनी कारवाईबाबत याबाबत थातुर मातुर उत्तरे देऊन संहितेचा तसेच राज शिष्टाचाराचा मुद्दा पायदळी तुडवला . तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हुतात्मा झालेल्या शहिदांचा अवमान केला गेला असून संबंधितांवर सातारा पंचायत समितीमार्फत कोणतीही कारवाई केली गेली नाही. या उलट संबंधितांना पाठीशी घालण्याचे काम सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी संबंधितांना पाठीशी घालण्याचे काम करीत असून माहिती अधिकार कार्यकर्ते रोहन (दादासाहेब ) राजेशिर्के व त्यांच्या सहकाऱ्यांनी या विरोधात दिनांक 22/07/2024 रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे आमरण उपोषणासाठी बसले याबाबतीत अद्यापही तिरंग्याचा अवमान करणाऱ्या तसेच आजी माजी सैनिक यांचा सुद्धा अवमान करणाऱ्या संबंधित अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसून ही बाब अशोभनीय आहे तरी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या ग्रामसेवक सरपंच उपसरपंच यांना कारवाई पासून वाचवण्याची तत्परता दिसून येत आहे ती अशी की दिनांक 22/07/2024 रोजी सायंकाळी उपोषण स्थळी गटविकास अधिकारी श्री. सतीश बुध्दे साहेब यांनी मला भेट दिली असता राजापुरी गावामध्ये 1 में 2024 रोजी ध्वजारोहण केले असल्याचा अहवाल माझ्या ताब्यात देण्यात आला त्या अहवालामध्ये ध्वजारोहण कार्यक्रमाचा फोटो छायाप्रत हा बनावट पद्धतीने जोडून गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीने पंचायत समिती सातारा यांच्या शिक्क्याने साक्षांकित करून मला व प्रशासनाला फसवण्याचे मोठे कटकारस्थान केले असून पुराव्यांबाबत कोणतीही खातरजमा न करता ग्रामसेवक सरपंच उपसरपंच यांनी दिलेले पुरावे मान्य करून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्म्यांचा अवमान केला असून सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व ध्वजारोहन करता शासनाची दिशाभूल करणाऱ्या ग्रामसेवक यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे व राजापूरचे सरपंच उपसरपंच यांना तात्काळ अपात्र करण्यात यावे अन्यथा उपोषण कर्ता रोहन अरुण राजेशिर्के (दादासाहेब) सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आमरण उपोषण मुंबई आझाद मैदान येथे आजी माजी सैनिक यांना घेऊन स्थलांतरित करण्यात येणार आहे यासंदर्भात कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यास प्रशासन सर्वस्वी जबाबदार असाल अशी भूमिका यावेळेस रोहन राजेशिर्के यांनी बोलून दाखवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here