वारकरीसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी वारकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण केल्याबद्दल सत्कार

0
125

सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज – परभणी – आज आप कार्यालय परभणी वसमत रोड येथे आम आदमी पार्टी परभणी जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वारकरी संप्रदायात अग्रेसर असणारे व्यक्ती महाराष्ट्रातल्या सर्व वारकऱ्यांसाठी वेगवेगळ्या मागण्या करणारे वारकरी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा वारकरी अपघाती विमा जाहीर करा आषाढी वारीच्या सर्व दिंडी चालकासाठी आर्थिक मदत द्या वारकऱ्यांसाठी तीर्थयात्रेसाठी मोफत गाड्या योजना राबवा वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा मोफत द्य तसेच मुलींना मोफत शिक्षण द्या अशा अनेक मागण्या वेगवेगळ्या परभणीच्या दौऱ्यावर येणाऱ्या सर्व आमदार खासदार मंत्री जिल्हाधिकारी सह यांना निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरवठा करणारे आणि या वरील सर्व मागणी पूर्ण झाल्याबद्दल वारकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्या यशाबद्दल आम आदमी पार्टीच्या वतीने पुस्तक शाल श्रीफळ हार देऊन स्वागत व सत्कार सन्मानित गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हाध्यक्ष परभणी विधानसभेचे उमेदवार सतीश नरहरी चकोर पाटील यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला याप्रसंगी आम आदमी पार्टीचे अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे नेते शेख इसाक आम आदमी पार्टी परभणीचे महासचिव अनिल देशमुख व मुरंबेकर सर्व आम आदमी पार्टीचे सर्व सेलचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती आम आदमी पार्टीचे शेख इसाक यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here