
विविध वार्ड युवक शाखाकरिता सुरज मेश्राम यांचा पुढाकार
रविंद्र मैंद तालुका प्रतिनिधी ब्रम्हपुरी- केंद्र व राज्य सरकारच्या काळात वाढलेल्या महागाई, बेरोजगारी मुळे आता सर्वसामान्यांसह युवकही वैतागले असुन युवकांचा काँग्रेस पक्षाकडे कल वाढलेला दिसत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी क्षेत्राचे आमदार माननीय नाम.विजयभाऊ वडेट्टीवार व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस ,मा.शिवानीताई वडेट्टीवार यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून, ब्रम्हपुरी शहरातील युवक काँग्रेस अध्यक्ष सुरज मेश्राम यांच्या नेतृत्वात गांधीनगर वार्ड येथे युवक काँग्रेस ची नवीन शाखा बनविण्यात आली.या सभेसाठी प्रामुख्याने चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सचिव तथा ब्रम्हपुरी नगर परिषद चे माजी बांधकाम सभापती व गटनेता मा.विलास विखार हे अध्यक्ष म्हणून तर ब्रम्हपुरी शहर काँगेस अध्यक्ष मा.हितेंद्र राऊत, चंद्रपुर जिल्हा काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष मा.मोंटू पिलारे,युवक काँग्रेस ब्रम्हपुरी विधानसभा अध्यक्ष मा.सोनू नाकतोडे,ब्रम्हपुरी युवक काँग्रेस अध्यक्ष मा.सुरज मेश्राम,तालुका काँग्रेस सचिव मा.सतिश डांगे, मा.रवी पवार, मा.ॲड.आशिष गोंडाणे, मा.प्रवीण नंदनवार व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष म्हणून उपस्थित मा. विलास विखार यांनी आपले विचार मांडताना म्हटले की,काँग्रेस पक्षात सामील झालेल्या सर्व युवकांचे स्वागत असुन काँग्रेस पक्ष हा युवकांना भरारी देण्याचे काम करीत असतो. सोबतच युवकांनी सुध्दा आता सक्रियपणे राजकारणात येऊन नेतृत्व करावे.इतर मान्यवरांनी सुद्धा आपले विचार व्यक्त करताना गांधीनगर येथे गठीत करण्यात आलेल्या नवीन कार्यकारिणी चे अभिनंदन करून पक्ष वाढीसाठी काम करावे असे सांगितले.गांधीनगर येथील युवक काँग्रेस नवीन कार्यकारिणी चे अध्यक्ष म्हणून सोनू पठाण,उपाध्यक्ष साहिल गजभिये,सचिव बादल मेश्राम, कोषाध्यक्ष शुभम बोरसरे,सहसचिव रोशन कावळे,तर सदस्य म्हणून सौरभ डोमळे, सुफियान शेख,उमेश सौंदरकर,उमेश रुईकर,महेश रुईकर,कैलास वेलथरे, श्रेयस धकाते,गणेश वानखेडे,आकाश मेश्राम,भोजराज मुंडे,दीपक निमजे,मयूर मेश्राम,सागर मरसकोल्हे, गुलशन अरगेलवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.निवड करण्यात आलेल्या पदाधिकारी,सदस्य यांचे ब्रम्हपुरी काँग्रेस कमिटी तथा युवक काँग्रेस व महिला काँगेस कमिटी तर्फे अभिनंदन करण्यात आले.सभेला बहुसंख्येने युवक उपस्थित होते.














