prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – शब्द फुले

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – शब्द फुले

0
11

कागदाच्या या कोऱ्या रानात,
शब्दांचे बी मी पेरतो,
भावनेच्या संजीवक स्पर्शाने,
मनाचा मळा मग फुलतो…१.

​नाही रंग, नाही वास यांना,
तरीही मन हे मोहून टाकती,
कधी मायेची फुंकर घालती,
तर कधी अन्यायावर आग
ओकती…२.

​लेखणीतून उमललेली ही फुले,
कधी स्वप्नांचे झुले होतात,
दवासारख्या हळव्या शब्दांनी,
दुभंगलेली मने जोडली जातात…३

​कधी शब्द होतात पारिजात,
तर कधी काट्यांचे कुंपण,
शब्दांच्या या फुलांनीच मिळे,
जीवनाचे सुंदर दर्शन…४.

​ह्या फुलांना कधीच मरण नाही,
ती सदैव सुगंध दरवळत राहतील,
माझ्या लेखणीच्या या वेलीवर,
नवी पालवी नित्य फुलवत
राहतील…५.

सौअनुराधा मारचट्टीवार
हैदराबाद तेलंगाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here