खा.अनुराग ठाकूर यांच्या विरोधात गोंडपिपरी काँग्रेसचे निषेध आंदोलन

0
81

कचरू मानकर तालुका प्रतिनिधी, गोंडपिपरी – जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी यानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय हक्क व त्यांचा वाटा तसेच भागीदारी मिळावी याकरिता इंडिया आघाडीचे नेते देशाचे विरोधी पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी संसदेत जातीय निहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याने मनुवादी व्यवस्थेच्या विचारधारेतून आलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते हिमाचल हमीरपूर येथील खासदार तथा माजी मंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेत राहुल गांधी यांची जात विचारून समस्त जनतेचा अपमान केला आहे.यामुळे संतप्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष तथा राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आज दिनांक ०२ ऑगस्ट रोजी येथील तहसील कार्यालयासमोर जाहीर निषेध आंदोलन केले.
अनुराग ठाकूर मुर्दाबाद, मनुवादी भाजप सरकार मुर्दाबाद, राहुल गांधी जिंदाबाद अश्या घोषणा देत आपला राग व्यक्त केला याप्रसंगी काँग्रेस नेते तुकाराम झाडे तालुका अध्यक्ष,राजू झाडे शहर अध्यक्ष,देविदास सातपुते अध्यक्ष सरपंच संघटना,अशोक रेचनकर संचालक कृ. ऊ.बा. स. सविता कुळमेथे नगराध्यक्ष,वनिता वाघाडे नगरसेवक, वनिता देवगडे, रंजना रामागीरकर,गौतम झाडे, संतोष बंडावार, बबलू कुळमेथे राजीव चंदेल, अजय माडुरवार,प्रवीण नरहरशेट्टीवार,बालाजी चनकापुरे, नामदेव सांगळे,ऍड.सचिन फुलझेले, नितेश मेश्राम, राहुल लडके,शुभम सुरकर, शुभम कोहपरे,विठ्ठल येलमुले यासह अनेक कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here