
रविवारी सायंकाळची घटना : व्यावसायिकासह नोकर गंभीर जखमी, व्यापाऱ्यांत दहशत
प्रशांत देशपांडे जिल्हा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क यवतमाळ –
धामणगाव मार्गावर मोबाईलही हिसकावला यवतमाळ शहरात कायदा सुव्यवस्था उरलेली नाही.शहरात गुन्हेगारांचा अक्षरशः धुमाकूळ सुरु आहे रणीसतीमंदिर परिसरात व्यावसायिकाला लुटण्यापुर्वी त्या संशयित दोन आरोपींनी धामणगाव मार्गावर एकाचा मोबाईल हिसकावून नेला. भरदिवसा शहरात लुटमारीचे सत्र सुरु आहे संशयित पवण राऊत आणि निखील शेलोदे या दोघांचा शोध पोलिस घेत आहे. या दोन्ही घटनांची रात्री उशिरापर्यंत पोलिसठाण्यात तक्रार दाखल झाली नव्हती.
यवतमाळ येथील रणीसती मंदिर परिसरात ढेप विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याच्या दुकानात दोन युवक तालावर घेऊन शिरले. त्यांनी व्यापाऱ्याला पैसे मागितले. त्याने नकार दिल्याने थेट तलवारीने हल्ला केला. यात व्यापारी व त्याचा नोकर हे दोघे जखमी झाले गल्ल्यातील रोख घेऊन दोघे पसार झाले. हि घटना रविवारी सायंकाळी ७:३० वाजता घडली या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावारण निर्माण झाले आहे. गणेश सिंघानिया व त्यांचा नोकर हे दोघे हल्ल्यात जखमी झाले आहे. त्यांना तातडीने खाजगीरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हल्लेखोरांची पोलिसांनीओळख पटविली आहे. ते पिंपळगाव परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्लेखोरांनी तिन ते चार लाख रुपयांची रक्कम नेली,असा अंदाज आहे. या घटनेनंतर पोलीस यंत्रणाही प्रचंड दबावात आली आहे. या घटनेचा व्हिडीओही सीसीटीव्हीमध्ये आहे.त्यावरूनचआरोपींचा शोध घेतला जात आहे.या गंभीर घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी थेट तलवारीने हल्ला करून व्यावसायिकाकडून रोख हिसकावुननेली आहे.














