जगदीश वडजे जिल्हा प्रतिनिधी नाशिक – आज अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत सुतार अध्यक्षतेखाली पुणे येथे पार पडलेल्या अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्याबैठकीत महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नाशिक येथील धडाडीच्या कार्यकर्त्या सारिका चंद्रकांत नागरे यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष प्रा. नानासाहेब टेंगले यांनीनिवडीचे पत्र दिले. यावेळी प्रदेशाध्यक्षा रेखा आखाडे,राज्य प्रसिद्दी प्रमुख कादंबरी वेदपाठक युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष किशोरजी मासाळ कार्याध्यक्ष सचिन शाहीर सचिव भारत भोंग,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अंबादासजी धनगर, उपाध्यक्ष राजू काका बुराडे तसेच सर्व राज्य कोर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. निवड एक वर्षाची असून श्रीमती सारिका नागरे यांनी यावेळी मत व्यक्त करताना सांगितले की, “ओबीसी समाजातील सर्व तळागाळातील महिलांना त्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील”.

