डॉ. अरविंद भातांब्रे यांनी केली निलंगा (238) विधानसभा मतदार संघासाठी तिकीटाची मागणी..

0
76

निलंगा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी घालून दिलेल्या नियमानुसार आज निलंगा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे नेते डॉ.अरविंद भातांब्रे यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे विधानसभा निवडणुकीची उमेदवारीची मागणी काँग्रेस पक्षाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष अँड.किरण जाधव यांच्या कडे केली डॉ.अरविंद भातांब्रे हे गेल्या अनेक वर्षांपासून निलंगा विधानसभा मतदारसंघात सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.अमित विलासराव देशमुख यांचे विश्वासू असून त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करत आहेत डॉ.अरविंद भातांब्रे यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघात आरोग्य शिबीर, पक्षाचे मेळावे ,आंदोलने आमरण उपोषण करून अनेक प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे ,आरोग्य सेवेच्या माध्यमातून अनेक गावात मेडिकल क्याम्प ,महिलांची मोफत तपासणी अश्या अनेक सेवा दिल्यामुळे त्याना आरोग्य दूत म्हटले जाते अश्या अनेक सामाजिक कार्याच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघातील आपली ओळख निर्माण केली असून सर्व महापुरुष जयंती सर्व धार्मिक कार्यात सहभाग व मदत करत सर्व धर्म समभाव जपणारा माणूस म्हणून आज ओळख निर्माण केली आहे लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत धोंडे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करून मतदारसंघातील दहा हजार कार्यकर्ते यांना एकत्र आणून ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित केला होता .महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सुद्धा अनेक वेळा एकत्र घेऊन अनेक सामाजिक तसेच राजकीय कार्यक्रमाचे आयोजन केले असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्वच्छ प्रतिमा, सुशिक्षित, तसेच सर्वाच्या अडीअडचणीला धावून जाणारा चेहरा म्हणून आज निलंगा विधानसभा मतदारसंघात डॉ.अरविंद भातांब्रे यांची ओळख निर्माण झाली असून त्यांना गेली निवडणुकीत 30 हजार मते मिळालेली होती म्हणून .काँग्रेस पक्षाचे निलंगा विधानसभा मतदारसंघातील तिकीट मिळावे अशी मतदारसंघातील नागरिक व कार्यकर्ते यांची इच्छा असून त्यानूसार आज डॉ.अरविंद भातांब्रे यांनी काँग्रेस पक्षाकडे तिकीटाची मागणी केली आहे. या वेळी लातूर शहर अध्यक्ष ॲड. किरनजी जाधव, सोशल मीडिया सेल जिल्हा अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी,प्रशिक्षण सेलचे जिल्हा आधक्ष चक्रधर शेळके, पंचायत समिती सदस्य महेश देशमुख, आंबेगाव चे चेअरमन प्रमोद मरुरे, अनिल पाटील, प्रवीण कांबळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here