प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूर तर्फे न्यू इंग्लिश विद्यालयात मुलींना मासिक पाळी आणि स्वच्छता तसेच रेड डॉट बॅग चे प्रशिक्षण आणि वापर याविषयी मार्गदर्शन देण्यात आले.
क्लब अध्यक्ष सुचिता जेऊरकर आणि सचिव पल्लवी तेलंग यांच्या उपस्थितीत डॉक्टर नंदिनी झाडे यांनी मुलींना मासिक पाळीमध्ये होणारे त्रास आणि त्यावर उपचार तसेच घ्यावयाची स्वच्छता यावर मार्गदर्शन केले आणि मुलींनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.
क्लबच्या माजी अध्यक्ष राखी बोराडे यांनी मुलींना पॅडची विल्हेवाट कशी लावायची आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रेड डॉट बॅग कशा पद्धतीने तयार करायच्या याचे प्रशिक्षण दिले.
मासिक पाळीविषयी जागरूकता आणि स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केल्याने मुलींना या नैसर्गिक प्रक्रियेविषयी अधिक माहिती मिळाली. रेड डॉट बॅगच्या वापराने पॅडच्या विल्हेवाटीचा प्रश्न सुलभ झाला आणि पर्यावरणपूरक मार्गांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळाले.

