दिपाली पाटील जिल्हा उप संपादक चंद्रपूर – इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूर तर्फे चंद्रपूर महिला कारागृहात दोन दिवसीय राखी प्रशिक्षन वर्ग आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन 6 ऑगस्ट 2024 रोजी पोलीस अधीक्षक माननीय कुमरे सर यांच्या हस्ते करण्यात आले. क्लब अध्यक्ष सुचिता जेऊरकर आणि सचिव पल्लवी तेलंग यांच्या उपस्थितीत क्लब सदस्या किरण आवळे यांनी सदस्य किरण बुरीले, श्वेता मस्के आणि विद्या ताकसांडे यांच्या मदतीने राखी प्रशिक्षणाला सुरुवात केली. या कार्यक्रमाचे संचालन कारागृह प्रशिक्षक हातवाडे सर यांनी केले.
या प्रशिक्षणामुळे महिलांना कारागृहाबाहेर निघाल्यानंतर स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
महिलांच्या हस्तकला कौशल्यांचा विकास होईल.
महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग होईल.
महिलांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी मदत होईल.

