सिंदेवाही येथे मंडल जनगणना यात्राचे जंगी स्वागत.

0
259

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर

ओबीसी,वि जे एन टी, एस. बी. सी यांच्या न्याय हक्क मागणी करीता जातीय जनगणना झालीच पाहिजे या हेतूने संविधान चौक नागपूर येथून सुरू झालेली मंडल जनगणना यात्राची आगमन सिंदेवाही शहरातील शिवाजी चौकात झाले.
याप्रसंगी तालुक्याच्या दौऱ्यावर असलेले विरोधी पक्ष नेते विजय वडट्टीवार यांनी भेट दिली, तसेच मार्गदर्शन केले. यावेळी मंडल यात्रेचे संयोजक उमेश कोराम, सहसंयोजक सुभाष उके, सुधाकर माथलकर, सतीश मालेकर, शंकर पाल उपस्थित होते. याप्रसंगी सिंदेवाही कांग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष रमाकांत लोधे,नगर पंचायत सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे,महिला तालुका अध्य्क्ष सीमा सहारे, नकटू सोनुले, कवडू मांडवकर, योगराज कावळे, धनंजय वाढई, अलका कावळे, अनिल लोनबले, जयश्री कावळे, प्रीती सागरे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here