‘मित्र माझा’ उपक्रमाचे सन्मान पत्र वाटप.
बुलढाणा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – बुलढाणा : नुकताच दिनांक ४ आगस्ट रोजी ‘मैत्री दिन’ मोठ्या उत्साहात साजरा झाला त्या निमित्ताने, वाचन छंद प्रेमी’ साहित्य समूहात ‘मित्र माझा’ विषयावर महाराष्ट्रसह इतर राज्यातील अनेक साहित्यिक लेखकांनी सहभाग नोंदवून,अप्रतिम काव्यलेखन केले.
साहित्यिक मा. बाबाजी हुले, कामोठे नवी मुंबई व कवयित्री स्वाती कुळकर्णी मुंबई तसेच,कवी राहुल रतन इंगोले संभाजी नगर यांनी मैत्री विषयावर सर्वोत्कृष्ट काव्य लेखन करुन उपक्रमाचा सर्वोत्कृष्ट मान मिळावला.
वाचन छंद प्रेमी’ साहित्य समूह आयोजित,’मित्र माझा’ विषयावर प्रा.पी.एस.बनसोडे, कवी बी. एस. केंद्रे, कवी वसंत गवळी, शाहीर मनोहर पवार,कवी विकास इंगळे, मा. तुळशीराम बोबडे, कवयत्री सौ. वत्सलादु सेमोराणकर, मा. जितेंद्र सोनवणे, सदर उपक्रमाचे परिक्षक डॉ. अशोक शिरसाट अकोला यांनी ‘ मित्र माझा’ विषयावर विविधांगी काव्यलेखन केल्या बदल सर्व सहभागी लेखकांना, वाचन छंद प्रेमी’साहित्य समूहाच्या वतीने सन्मान पत्र देउन गौरवण्यात आले.
दरम्यान, वाचन छंद प्रेमी’ साहित्य समूह संस्थापक-आयोजक, मा. बबनराव वि. आराख यांनी सर्व सहभागी लेखकांचे अभिनंदन करुन, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

