राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – ब्रम्हपूरी तालुक्यातील चौगान येथील बहुसंख्य भाजपा कार्यकर्त्यांनी नुकताच काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे.
ब्रम्हपूरी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विविध विकासकामे सुरू असुन ब्रम्हपुरी मतदारसंघाची वाटचाल विकासाच्या दिशेने सुरू आहे. येत्या काळात विकसित विधानसभा क्षेत्र म्हणून ब्रम्हपूरी पुढे येणार आहे. हे सर्व राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नामुळे होत आहे.
त्यामुळे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांनी केलेल्या विकासकामांवर व त्यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून ब्रम्हपूरी
तालुक्यातील *चौगान येथील बहुसंख्य भाजपा कार्यकर्त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.* यावेळी पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे पक्ष प्रवेश पार पडला.
*यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ राजेश कांबळे, जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, काॅंग्रेस तालुका उपाध्यक्ष नामदेव लांजेवार यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये प्रकाश भागडकर, उद्धव कांबळी, घनश्याम बुराडे, रामदास प्रधान, वामन भागडकर, चिंतामण प्रधान, चिंतामण मानकर, घनश्याम मैंद, बंडू चिंचोलकर, बंडू सहारे, भाऊराव मेश्राम, रमेश पीलारे, गोपाल देशमुख, दामोदर ननावरे, भोजराज ननावरे, जयदेव कुंभरे, सुनील बुराडे, अण्णा भाकरे, रोशन बुराडे, उमेश भुरके, योगी चौके, श्रावण मैंद, अण्णा चुंडुके, पिंटू ठाकरे, बंटी कुथे, संदीप प्रधान, प्रवीण ठाकरे, गणेश राऊत,आनंदराव प्रधान, अमोल कांबळे, डॉक्टर प्रवीण सरदार, गिरीधर भुते, नितेश पत्रे, मंगेश भागडकर, विलास चौके, लंकेश अर्जुनकार, विष्णू अर्जुनकार, उमेश भुरके, लंकेश अर्जुनकार, विजय सहारे, अनिरूद्ध माकडे, मनोहर चौके, पुरुषोत्तम सहारे, गोपाल बुराडे यांसह अन्य कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश आहे.

