प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – ऊर्जानगर (चंद्रपूर):-कोणतीही संस्था असो की संघटना त्याचा सभासद हा एकमेव व्यक्ती असतो जो संघटना वाढीकरिता दुवा असतो त्याच्या सहकार्यामुळेच संघटनेची भरभराट होण्यास मदत होते त्यासाठी संघटनेच्या सभासदांची एकनिष्ठता हीच खरी संघटनेची ताकत असते असे प्रतिपादन मा.नरेंद्र रहाटे केंद्रीय सरचिटणीस यांनी केले ते महाराष्ट्र नवनिर्माण विज कामगार संघटना द्वारा आयोजित स्नेहमिलन सोहळा कार्यक्रमात बोलत होते.स्नेहबंध सभागृह ऊर्जानगर वसाहत येथे आयोजित संघटनेचा स्नेहमिलन कार्यक्रम नुकताच पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.नरेंद्र रहाटे केंद्रीय सरचिटणीस मनसे संघटना, उद्घाटक मा.ज्ञानेश्वर ढोमने उपमुख्य अग्निशमन अधिकारी सी एस टी पी एस,प्रमुख अतिथी मा.हरीश रहाटे केंद्रीय सहसचिव,श्रावण चव्हाण मुख्य सुरक्षितता अधिकारी सी एस टी पी एस,मा.प्रशांत नरड अध्यक्ष मनसे संघटना महावितरण चंद्रपूर, मा.विक्की राठोड अध्यक्ष मनसे संघटना सी एस टीपी एस,मा.राजा वेमुला कार्याध्यक्ष, मा.देवराव कोंडेकर सचिव ,मा.देवेंद्र मालुसरे मुख्य संघटक,मा.धर्मेंद्र कनाके कोष्याध्यक्ष तसेच महिला पदाधिकारी मा.वंदना मनपे, कमल चिवंडे, रुपाली मरस्कोल्हे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात मान्यवरांनी संघटनेच्या पदाधिकारी व सभासदांकरिता बहुमूल्य मार्गदर्शन केले. यावेळी संघटनेच्या सेवानिवृत्त सभासदांचा तसेच नवीन जुडलेल्या सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा.सुभाष शेडमाके केंद्रीय सचिव मनसे संघटना यांनी केले प्रास्तावना देवराव कोंडेकर यांनी तर आभार नारायण चव्हाण यांनी मानले शेवटी स्नेहभोजन घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

