शालेय मुख्यमंत्री म्हणून कु. समृध्दी मेश्राम यांची निवड
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय, वासाळा ( ठाणेगाव)तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे शालेय मंत्रिमंडळ गठीत करण्यात आले.
लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली.यात विविध पदांकरीता अनेक विद्यार्थांनी आवेदन पत्र दाखल केले होते.विद्यार्थांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने त्यांना राजकीय क्षेत्राचे ज्ञान मिळावे हा त्यामागील उद्देश होता.यामध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली असून मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री कोण असणार याकडे सर्वांची लक्ष लागलेली होती.
यात पाचवी ते आठवी इयत्तेसाठी उपमंत्री पद तर नववी ते बारावी इयत्तेसाठी मंत्री पद राखीव ठेवण्यात आले होते.या अतिशय चुरशीच्या आणि शांततेच्या वातावरणात पार पडलेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री म्हणून कुमारी समृद्धी मेश्राम तर उपमुख्यमंत्री म्हणून किंजल भोयर निवडून आल्या आहेत.विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून पूजा आलबनकार , विद्यार्थिनी उपप्रतिनिधी म्हणून स्नेहल मेश्राम ,पर्यावरण व सहल मंत्री प्राजक्ता उरकुडे, पर्यावरण व सहल उपमंत्री म्हणून उन्नती धंदरे ,शिक्षणमंत्री रीना बानबले,उपशिक्षणमंत्री नियती वाघरे , क्रीडामंत्री सन्मित्र गुळंकवार तर उपक्रीडामंत्री कुणाल राऊत ,सांस्कृतिक मंत्री रीना मेश्राम तर सांस्कृतिक उपमंत्री कांचन राऊत ,स्वच्छता व आरोग्य मंत्री आयुष मंगरे तर स्वच्छता व आरोग्य मंत्री म्हणून कोमल सहारे निवडून आले आहेत.
निवडून आलेल्या सर्व मंत्री आणि उपमंत्री या सर्वांचे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सुनिल मेश्राम,पर्यवेक्षक प्रमोद दिघोरे तसेच सर्व प्राध्यापक ,शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे कौतुक केले आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी प्राचार्य मेश्राम सर पर्यवेक्षक दिघोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शेषराज खोब्रागडे सर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर सहाय्यक प्रा.विनोद कुनघाडकर यांनी यशस्वीरित्या आपली भूमिका पार पाडली.तसेच प्रा.नानाजी रामटेके ,भास्कर उरकुडे ,जितेंद्र नरूले सर चंद्रशेखर निकुरे सर , हेमंत मोहितकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.प्राचार्य मेश्राम सर यांनी निवडून आलेल्या मंत्री व उपमंत्री यांना त्याच्या पदाची व गोपनीयतेची शपथ दिली.

