परळी तहसील कार्यालयाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे ऑफलाईन अर्ज स्वीकारावे- बालासाहेब जगतकर.

0
71

परळी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज-परळी तहसील कार्यालयाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचे ऑफलाइन अर्ज स्वीकारावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा साप्ताहिक माणपत्र चे संपादक व तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब जगतकर यांनी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना जाहीर केली असून या योजनेसाठी महिलांना रक्षाबंधनापूर्वी मानधन देण्यात येणार असून त्यामुळे ऑनलाइन फॉर्म भरण्यास सांगितले असता सध्या ऑनलाईन सर्वर बंद असल्यामुळे महिलांना फॉर्म भरण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे त्यातली त्यात परळी नगरपालिका फॉर्म भरून घेण्यास उदासीनता जाणवत असल्यामुळे परळी तहसील कार्यालयाने आंबेजोगाईच्या धरतीवर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म ऑफलाईन स्वीकारावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख साप्ताहिक मानपत्रचे संपादक व तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जगतकर यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here