जळगाव प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज,- भाजपने आणलेली” लाडली बहीण योजना” म्हणजे महिलांना सक्षमीकरण न देण्याचा प्रयत्न. जिथे महिला सक्षम होऊन जात असेल, तिला सक्षम न करता घरी बसल्या जर १५००/ देत असतील तर तिच्यामध्ये ती प्रेरणा येणार कुठून, की आपण काहीतरी काम करावं आणि स्वतःच्या महिनतीवर १५०० न घेता ,आपण 15000 हजार, २ लाख, पाच लाख, दहा लाखापर्यंत कमाई करावी .ही जेव्हा प्रेरणा निर्माण होते त्यांच्यासाठी उद्योग व्यवसाय निर्माण होतात तीच खरी योजना म्हणजे लाडली बहीण योजना. आणि दुसरी गोष्ट “लाडली बहीण योजनां”मध्ये कुठेही डॉक्टर महिला, बिझनेस मॅन महिला, ऑफिसर्स महिला, इंजिनियर्स महिला, उद्योग व्यवसाय करणाऱ्या महिला यांचं “जीएसटी खरच कमी झाला आहे का ??जिथे नीता अंबानी सारख्या उद्योजकांचे जीएसटी कमी होतात, परंतु तिथे सर्वसामान्य महिला ज्या आज सक्षम आहेत. आपल्या व्यवसायामध्ये त्या महिलांचे हजारो ने “जीएसटी” आणि “टॅक्स रिटर्न “वसूल केल्या जाते हे मोठे दुर्दैव या भाजप सरकारने त्यांच्या राज्यामध्ये आणलेला आहे. आणि केंद्रामध्ये आणलेला आहे .सामान्य गोष्टी आहेत, ज्याचा विचार कधीच भाजपने केला नाही .सामान्य जनतेसाठी त्यांनी कधीच विचार केला नाही. हीच” लाडकी बहीण योजना जेव्हा जीवघेणी होणार, तेव्हा “सिलेंडरचे भाव”हजाराच्या वरती आहेत ,हीच लाडली बहीण योजना महागाईच्या दुध, दही च्या गोष्टीवर “जीएसटी “लावणार ,असे मत काँग्रेसचे जिल्हा सचिव डॉ. ऐश्वर्री राठोड यांनी व्यक्त केले.

