तिरुमलेश कंबलवार अहेरी प्रतिनिधी – अहेरी :- अहेरी तालुक्यातील आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील असलेल्या नाग मंदिर येथे नागपंचमी निमित्य पूजेसाठी भाविकांची अलोट गर्दी झाली. नागपंचमी निमित्य नागमाता मंदीर येथे लाखोच्या संख्येने भक्त येत असतात. एवढेच नव्हे तर जास्त प्रमाणात दुकाने लावण्यात आले मंदिरात भजन कीर्तन आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. एवढेच नव्हे तर मोठ्या श्रद्धेने आलेल्या भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी नागदेवता मंदिर समिती . भाविकांची काळजी घेत सर्वांना सहकार्य केले.
जिल्ह्याच्या दक्षिण भागातील भाविक मोठ्या श्रद्धेने याठिकाणी येऊन पूजा करतात. नागदेवता आणि शंकर भगवानची पूजा आणि अभिषेक करून दूध आणि मखाना यांचा नवैद्य अर्पण करतात. सकाळ पासूनच याठिकाणी गर्दी झाली होती. मंदिर राष्ट्रीय महामार्गावर असल्याने ट्रॉफीक जाम होऊ नये म्हणून पोलिसांचाही चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.

