आजची कविता – रंग मनोहर आठवणींचा

0
98

गावाकडल्या आठवणींचा
रंग मनोहर मनात भरतो
तनामनावर वाऱ्यासंगे
मातीमधला गंध पसरतो

हिरवी शेते हिरवी राने
गरगर गोफण पक्षी उडतो
आजोबांच्या गोष्टीमधला
पार वडाचा साद घालतो

आईच्या पदराचा दरवळ
व्याकुळ संध्याकाळी येतो
आर्त हाक तिच्या काळजाची
गर्द थंडीत जीव कापतो

गमंत जमंत सखेसोबती
हरवले अंगण आठव येतो
स्वतंत्र आहे परदेशी मी
तुटते माझी नाळ पाहतो

अमुर्त् संस्कृती जरी देशाची
घरात माझ्या आम्ही जपतो
विश्व वेगळे देश वेगळा
नवे अस्तर मी पांघरतो..

यावेसे वाटेल का मला
गेल्यानंतर आई म्हणतो
भाग्यरेषा तिथेच रेखतो
काळजाचा मग दगड होतो…

कवियत्री,- गूलाब अनिल वेर्णेकर
गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here