prabodhini news logo
Home जळगांव बलात्कार, एन्काऊंटर, महिला सुरक्षा वरील गंभीर प्रश्न त्वरित थांबवा

बलात्कार, एन्काऊंटर, महिला सुरक्षा वरील गंभीर प्रश्न त्वरित थांबवा

0
197

जळगाव प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क- डॉ. ऐश्वर्री राठोड या पत्रकारांशी बोलताना बोलल्या की “कोलकत्ता रेप केस” मध्ये अतिशय दुर्दैवी पणे डॉक्टर चा मृत्यू झाला. स्वतःच्या स्टाफ मधलेच लोक तिला ज्या प्रकारे त्रास देत होते आणि ज्या प्रकारे तिचे ते 40 मिनिटं हायवानियत त्यांच्याच कलिग्ने आणि काही बाहेरच्या लोकांनी केली ही फार मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. कोलकत्ता डॉक्टर सोबत जे झालं ते देशामध्ये इतर महिलांसोबतही बऱ्याचदा होत आलेल आहे. बरेच बलात्कार झाले, परंतु आज पर्यंत या बलात्काऱ्यांना फक्त “हैदराबाद एन्काऊंटर केस” सोडल्यानंतर कुठेच “एन्काऊंटर” केल्या गेले नाही. आणि कुठेच “फाशीवर” चढवल्या गेले नाही. कोलकत्ता डॉक्टरची केस ही फार मोठी दुर्दैव. ममता बॅनर्जी या स्वतः महिला मुख्यमंत्री असल्यानंतर त्यांनी जर एन्काऊंटर” या आरोपींची केलं असतं, तर निश्चितपणे देशांमध्ये महिलांना वाटलं असतं की एका महिलेने या बलात्कारांचा आज सर्वनाश केला. एन्काऊंटर सुद्धा महिला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी करू शकले नाही. त्या जरी इंडिया आघाडीमध्ये असल्या तरी सुद्धा आज जे दुर्दैव कृत्य कोलकत्ता डॉक्टर सोबत झालेलं आहे ते माफ करण्यासारखं नाहीये .ती आपल्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती ,जिचे स्वप्न डॉक्टर बनण्याचे होते ,आपल्या वडिलांच्या हालाखीच्या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढण्याचे होते, परंतु तो स्टाफ जो तीच्या सोबत काम करत होता. त्यांनीच तिचा अंत केला. त्यांच्या हैवानियत पुढे, त्यांच्या वासने पुढे ,किती दिवस अशा प्रकारे महिला वासनेच्या शिकार होतील. या” पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये “एकच सांगावस वाटते ,यावेळेस डॉ.ऐश्वर्री राठोड यांच्या डोळे पाणावले त्यांना रडू आले ,आणि त्यापुढे बोलल्या एक डॉक्टर होण्यामध्ये किती मेहनत लागते आणि कशाप्रकारे करिअर घडते .हे हायवानियत संस्कृती असलेले बलात्कारी काय समजणार .ही बलात्कारी प्रवृत्ती देशांमध्ये बंद झाली पाहिजे. यापुढे बलात्कारांचं वेळीच एन्काऊंटर करा. नाहीतर अशा कित्येक घटना देशांमध्ये होत राहतील .आणि अशा घटनांमध्ये ज्या महिलांचा काही दोष नाही अशा महिलांच्या प्रतिमेचा चुराडा होईल .देशांमध्ये रस्त्याने चालताना काम करताना, कुठेही महिला यांना सुरक्षित त्यांना अनुभव आला पाहिजे. जर अशी असुरक्षितता देशांमध्ये जर जाणवत असेल .तर यापेक्षा मोठे दुर्दैव कुठलं. मग काय महिलांनी स्वतः सोबत हत्यार बाळगून रस्त्याने चालायचं ,किंवा कामावर जायचं हेच आता पुढील काळामध्ये महिलांना करावा लागेल. अशा प्रकारचे आरोपी प्रवृत्ती जर या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये होत असेल तर यापेक्षा “नीच प्रवृत्तीची” गोष्ट कुठलीच नसावी. डॉक्टर महिलेला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्या आरोपीचं निश्चितपणे फाशी किंवा एन्काऊंटर झालं पाहिजे. तिचे कपडे छोटे नव्हते ,तिचा दिखावा मोठा नव्हता, ती सर्वसामान्य महिला होती, तिने संपूर्ण कपडे घातलेले होते, पण या “दहशती वासना प्रवृत्ती” संस्कृतीला या गोष्टी कळणार नाही .यांच्या मनातील वासना यांचा नाश कधी ना कधी झाला पाहिजे .आणि तो आत्ताच झाला पाहिजे. नाही तर अशा प्रकारची वाचना प्रवृत्ती या कलियुगामध्ये जर राहिली तर, महिलांना पुढे स्वातंत्ररूपी जगणं मुश्कील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here