यवतमाळ शासकीय रुग्णालयातील परिचारिकांचे आंदोलन

0
71

प्रशांत देशपांडे जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ ८८५५९९७०१५ – यवतमाळ: वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका यांच्यावर सातत्याने हल्ले होत आहे. कोलकाता येथे आंतरवसिता डॉक्टरची तर उत्तराखंड येथे परीचारिकेवर अत्याचार करुन हत्या करण्यात आली. या घटना सातत्याने वाढत आहेत. दिवसरात्र सेवा देणाऱ्या डॉक्टर महिला परिचारिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने कायम स्वरुपी उपाय योजना कराव्यात यासाठी यवतमाळ शासकीय रुग्णालयातील परिचारिकांनी आंदोलन सुरु केले आहे. त्यांनी काळया फिती लाऊन काम करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परिचारिकांनी शासनाकडे प्रमुख सहा मागण्या केल्या आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी २५ ऑगस्ट पर्यंत काळया फिती लावून काम करणार आहेत त्यानंतर २६ ते २८ ऑगस्ट दरम्यान रोज एक तास काम बंद आंदोलन व निदर्शने केली जाणार आहे. मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालयात बळकट सुरक्षा उपाय योजना कराव्यात, वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यात यावे सर्व संस्था सर्व सुविधांनी युक्त व महिला परिचारिका डॉक्टरांसाठी सुरक्षित चेंजिग रुम तातडीने द्याव्यात. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना वसतिगृह उपलब्ध नसल्याने रूम दिल्या जातात. यामुळे भांडार रुम, परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांना स्वतंत्र बाथरुम उपलब्ध होत नाही, याची व्यवस्था करावी शासकीय रुग्णालयांमध्ये पोलीस चौकी उभारुन तिथे पुर्णवेळ कर्मचारी तैनात करण्यात यावे रुग्णालय परिसरात व वॉर्ड मध्ये सुरक्षा रक्षकांची पेट्रोलिंग ठेवावी, अशी मागणी महारष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here