
सुरेश मल्हारी पाईकराव संस्थापक अध्यक्ष सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर
प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर – आज दिनांक 22 आगष्ट 2024 रोजी सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांच्या वतीने चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना मागणी करण्यात आली.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील नामांकित शाळेतील स्वच्छतागृहात दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडीस आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली असून या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. पोलिसांच्या तपासात सदर शाळेच्या व्यवस्थापनाच्या अनेक त्रुटी आढळून आल्या असून निष्काळजीपणाही उघड झाला आहे. यामुळे विद्यार्थी सुरक्षा आणि शाळा व्यवस्थापन पद्धतींबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. भविष्यात अशी दुर्देवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी तातडीने चंद्रपूर जिल्ह्य़ातील सर्व शाळांमध्ये जिल्हा परिषद शाळा, विद्यालय, महाविद्यालय, ITI, इंजिनिअर मेडिकल कॉलेज, सरकारी व खाजगी इतर सर्व शाळांमध्ये कठोर उपाययोजना आणि अधिक चांगल्याप्रकारे देखरेख करण्यात यावी.
शाळांमध्ये खालीलप्रमाणे :-
१. मुलींच्या स्वच्छतागृहात महिला कर्मचारी नेमणे व मुलांच्या स्वच्छतागृहात पुरुष कर्मचारी नेमण्यात यावेत
२. शाळांमधील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत करणे.
३. शाळेमधील कायमस्वरूपी आणि ठेकेदार पद्धतीने काम करणाऱ्या आया,मावशी, शिपाई या कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड ठेवणे
४. शाळेमध्ये कर्मचारी भरती करताना त्यांचे गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे का नाही ते तपासणी करण्यात यावी
५. शाळेमध्ये किमान महिन्यातून एकदा Bad Touch & Good Touch प्रशिक्षण देण्यात यावे.
६. विद्यार्थ्यांसाठी बस,व्हॅन, रिक्षा या वाहन मालकांची माहिती घेणे
७. तसेच बसेस मध्ये महिला कर्मचारी नेमणे.
८. शाळांमध्ये तक्रार पेटी लावण्यात. यावे
तरी सदर बाबींचा गांभीर्याने विचार करून तातडीने सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात करा असे निवेदन सादर करतांना संस्थापक अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, बबन वाघमारे वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव उपाध्यक्ष दत्ता वाघमारे IT सेल प्रमुख आशिष परेकर यादी उपस्थित होते.














