prabodhini news logo
Home चंद्रपूर दुर्गापूर ताडोबा रोड वरील नव्या रोड वर तात्काळ स्ट्रीट लाईट व स्पीड...

दुर्गापूर ताडोबा रोड वरील नव्या रोड वर तात्काळ स्ट्रीट लाईट व स्पीड ब्रेकर लावा.

0
170

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अभियंत्याना निवेदन

दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक, चंद्रपूर : ताडोबा रोडवरील राज्य महामार्गावर शक्तिनगर गेट पासून कोयना गेटच्या पुढे पद्मापुर रोड वर नव्याने सिमेंट काँक्रिट रोडचे कोट्यवधी रुपये खर्चून बांधकाम करण्यात आले. रोडच्या मध्यभागी आकर्षक झाडांचे सौंदर्यीकरण करून सदर परिसर विकसीत करण्यात आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वैद्यकीय विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा पंचायत समितीचे माजी सदस्य पंकज ढेंगारे यांनी अभिनंदन केले.

मात्र या नव्याने बनलेल्या रोडवर लाईट ची व्यवस्था करण्यात न आल्याने सदर परिसरात रात्री सर्वत्र अंधार असते. ताडोबा या राष्ट्रीय उद्यानाकरिता देश विदेशातील पर्यटक याच मार्गाने जा ये करतात. तसेच या मार्गाने वेकोली ची खान असल्याने मोठ्या प्रमाणात सायंकाळच्या नंतर मोठ्या अवजड वाहनांची देखील वर्दळ असते त्यामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता असल्याने या रोडवर स्ट्रीट लाईट व स्पिड ब्रेकर लावणे अत्यंत गरजेचे असल्याचे आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्ष्यात आणुन देण्यात आले.

तसेच दुर्गापूर हे मोठी बाजारपेठ असून या मार्गे सिटीपिएस वसाहतीसह खैरगावं, आंभोरा, सीनाळा, मसाडा, नवेगाव, पद्मापूर, मोहरली, आगरझरी, भटाळी, किटाळी, वडोली, चिचोली, कडोली, पायली या गावातील नागरीकांचे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात जाणे येणे असते. यातील अनेक गावातील नागरिक रात्री काही टप्यांवर थांबून गावी जाणे करिता ऑटो किंवा मिळेल त्या साधनांची वाट पाहत अंधारात थांबत असल्याने वन्यप्राण्यांच्या सुध्दा धोका उद्भवण्याची शक्यता आहे.

करिता भविष्यात अपघात होऊन किंवा वन्यप्राण्यांच्या हल्यात कोणत्याही निष्पाप, निरागस नागरीकांचे नुकसान होऊ नये याची काळजी घेत लवकरात लवकर या परिसराची पाहणी करून जेथे आवश्यकता असेल तेथे स्पीड ब्रेकर लावावे तसेच तात्काळ या नवीन रोडवर लाईट लावावे या मागणीचे निवेदन आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितिन भटारकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वैद्यकीय विभागाचे जिल्हाध्यक्ष पंकज ढेंगारे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रोशन फुलझेले, ग्राम पंचायत उर्जानगर चे सदस्य अनुकूल खन्नाडे, खैरगावचे ग्रामपंचायत सदस्य अंकित ढेंगारे व आशिष ठक्कर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here