“माझ्या स्वप्नातील भारत” या स्पर्धा विषयाचा निकाल जाहीर

0
212

रवि ताकसांडे सर्वोत्कृष्ट क्रमांकाने सन्मानित

प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज – डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र आयोजित दिनांक १४ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत घेण्यात आलेल्या माझ्या स्वप्नातील भारत या विषयावर ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली होती.
यात ४३ कवी कवयित्री यांनी सहभाग नोंदविला.या स्पर्धा विषयाचा निकाल दिनांक २२ ऑगस्ट २०२४ रोजी जाहीर करण्यात आला.
यामध्ये सर्वोत्कृष्ट क्रमांक रवि ताकसांडे गडचांदुर जिल्हा चंद्रपूर यांना समूहाच्या वतीने सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष प्राविण्य प्राप्त क्रमांक श्री.समाधान दिनकर लोणकर हिंगोली, उत्कृष्ट क्रमांक वैशाली जगताप बोरसे धुळे, प्रथम क्रमांक विनायक कृष्णराव पाटील बेळगाव, सुभाष मानवटकर हिंगणा नागपूर ,द्वितीय क्रमांक वनमाला भालेराव आर्णी, शुभांगी अशोक निमकर यवतमाळ, जयद्रथ आखाडे पुणे, तृतीय क्रमांक लोपामुद्रा शहारे नागपूर, प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे लातूर,डॉ.रेखा पौडवाल गोवा, उत्तेजनार्थ क्रमांक प्रा.हंसराज रंगारी कल्याण, जागृती निखारे पुणे, डॉ.नेहा भालेराव कल्याण,कल्पना टेंभूर्णीकर नागपूर,नम्रता खरे मुंबई ,भावस्पर्शी क्रमांक राजेश लक्ष्मण वऱ्हाडे कसुरा,श्री.अंकुश नथुराम जाधव निवी रोहा ,सविता कांबळे कर्जत ,अन्नपूर्णा बाबुराव वानखेडे ,रघुनाथ दहिवाडे वरूड ,लक्षवेधी क्रमांक गायकवाड मनोज रामचंद्र शहापूर,सुनंदा मधुकर अंभोरे औरंगाबाद, मधुकर गोपनारायण नागपूर ,सूर्यकांत कांबळे कोल्हापूर,राजाराम भीमराव कांबळे नवी मुंबई,विश्रांती विश्वास तानाप्पागोळ , मीरा वासनिक कल्याण यांनी प्राप्त केला.
या स्पर्धेच्या परीक्षिका म्हणून प्रांजली प्रविण काळबेंडे (काव्यप्रंजु) यांनी पार पाडले. विजेत्या सर्व कवी कवयित्री यांचे अभिनंदन आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र या समूहाचे प्रमुख सल्लागार मा.विनोद जाधव,अध्यक्ष मा.नरेंद्र पवार,उपाध्यक्षा माला मेश्राम, अनिल सावंत सचिव यांनी दिल्या. प्रा.नानाजी रामटेके यांनी समीक्षक म्हणून काम पाहिले.वैशाली गायकवाड खंडारे छत्रपती संभाजीनगर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here