
चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – राष्ट्रीय चर्मकार महासंघ चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने समाज जनजागृती अभियान महाराष्ट्र दौऱ्याचे आयोजना संदर्भात २२ ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह चंद्रपुर येथे समाज जनजागृती अभियाना अंतर्गत राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा कार्यकर्ते तथा महानगरातील कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेऊन विविध विषयावर चर्चा करण्यात आली, माननीय श्री बबनराव घोलप राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष,यांचा आदेशानुसार तसेच मा श्री माधवराव गायकवाड प्रदेश अध्यक्ष व मा श्री संबा वाघमारे विदर्भ अध्यक्ष यांच्या नेतृत्वात् समाज जनजागृती अभियान महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करण्यात आली आहे, संघटनेचे प्रदेश युवा अध्यक्ष रवींद्र खैरे, अमर तांडेकर, प्रदेश कार्याध्यक्ष गजानन भटकर, प्रदेश सचिव लीलाधर कानोडे, जिल्हा अध्यक्ष विप्लव लांडगे,जेष्ठ जिल्हा अध्यक्ष हरीश घोरे जिल्हा उपाध्यक्ष गंगाधर खंडाळे,गटई कामगार जिल्हा अध्य्क्ष संतोष तांडेकर, युवती जिल्हा अध्यक्षा भाग्यश्री हांडे तसेच , बल्लारपुर तालुका अध्यक्ष दिनेश भटवलकर,जेष्ठ नेते खुशाल हांडे, जेष्ठ शाखाध्यक्ष मोतीलाल भोंडेकर दुर्गापूर यांची यावेळी उपस्थिती होती
या कार्यक्रमात गटई कामगार जिल्हा अध्यक्ष संतोष तांडेकर यांच्या कामाची दखल घेत मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष विप्लव लांडगे यांनी केले तर सुत्रसंचालन संतोष तांडेकर यांनी केले व आभार प्रदर्शन दिनेश भटवलकर यांनी केले.तसेच महाराष्ट्र दोऱ्या दरम्यान देवानंद लांडगे यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी .हिरामण खंडाळे यांची विदर्भ सचिव पदी तसेच नितीन अंडेलकर यांची प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी नियुक्ती पत्र देऊन निवड करण्याताली. तसेच पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या.











