दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या वर आर्वी पोलिसांनी कारवाई

0
64

दोन मोटरसायकल व गावठी मोहा दारू सह एकूण 1,49’800 रुपयांचा मुद्देमाल जप्त

अर्पित वाहने
आर्वी प्रतिनिधी

मौजा छिंदवाडी कडून आर्वी कडे मोटर सायकलने गावठी मोहा दारूची वाहतूक होत असल्याबाबत मुखबीर कडून माहिती मिळाल्यावर आर्वी- देऊरवाडा रोडवरील मोहन रेस्टॉरंट समोर नाकाबंदी करून प्रो रेड केला असता.
आरोपी क्रमांक1) उमेश रामराव जाधव वय 23 वर्ष राहणार शिंदवाडी तालुका तिवसा जिल्हा अमरावती याचे ताब्यातून एका रबरी ट्यूब मध्ये प्रत्येकी 60 लिटर गावठी मोहा दारू प्रति लिटर 200 रुपये प्रमाणे 12000 चा व रबरी ट्यूब किंमत 400/₹ एक जुनी वापरते पांढ-या रंगाची सुझुकी कंपनीची एसेस मोपेड गाडी क्र MH 27 AP 9778 किंमत 60000 रुपये असा जुमला किंमत 72400/₹ चा माल जप्त करण्यात आला.
तसेच आरोपी क्रमांक 2) प्रणय रामपाल काळे वय 19 वर्ष राहणार शिदवाडी तालुका तिवसा जिल्हा अमरावती यांचे ताब्यातून एका रबरी ट्युबमध्ये 60 लिटर गावठी मोहा दारु, प्रती लिटर 200/- रु. प्रमाने 12000/- रु. व एक जुनी वापरती बजाचे कंपनीची पल्सर मोटर सायकल क्रमांक एम.एच.27/ए. एम ./0998 किमंत 65000/- रु. व रबरी ट्युब, 400/-रु. असा जुमला किमंत 77,400/- रू माल अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आल्याने वरील आरोपीतांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आलेली आहे
सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक अनुराग जैन, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, यांचे मार्गदर्शनात माननीय उपविभागीय पोलीस देवराव खंडेराव साहेब, पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे यांचे निदर्शनात, पोहवा रामकिसन कासदेकर, पोहवा दिगंबर रुईकर, पोशी राहुल देशमुख. स्वप्निल निकोरे. निलेश करडे आदींनी केलेली..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here