शारदा भुयार महिला जिल्हा प्रतिनिधी, वाशीम- कारंजा : बहिणींना समाजात सन्मानाने जगता यावे.या उदात्त भावनेतून १ जुलै २०२४ पासून राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी-बहिण ही महत्वाकांक्षी योजना लागू केली आहे.या योजना समितीच्या जिल्हाध्यक्षपदी, कारंजा कर्मभूमितील भाजपाचे अभ्यासू व्यक्तिमत्वाचे धनी असलेले युवा नेते तथा कारंजाचे लाडके जावाई असलेल्या आमदार पुत्र ॲड.ज्ञायक राजेंद्र पाटणी यांची निवड झाल्यामुळे जिल्ह्यातील भाजपाच्या युवा कार्यकर्ते आणि कारंजेकरांमध्ये नवचैतन्य पसरले असून, त्यांच्या रुपाने जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या न्याय व हक्कासाठी लढणारा हक्काचा एक भाऊ मिळाला असल्याची भावना कारंजेकरांनी व्यक्त केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून राज्यात लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. राज्यातील संपूर्ण पात्र बहिणींना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे.लाखो महिलांच्या बँक खात्यात या योजनेचा पहिला हफ्ता जमा सुद्धा झाला असून, उर्वरित महिलांना पुढील महिन्यात मागील व चालू महिना मिळून पूर्ण रक्कम दिली जाणार आहे.तथापि,या योजनेपासून कुठलीही पात्र बहिण वंचित राहु नये.म्हणून एक समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्षपद विद्यमान आमदाराला दिले जात असते. परंतु,भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या आदेशावरून पालकमंत्री संजय राठोड यांनी या समितीच्या अध्यक्षपदी,अभ्यासू व्यक्तिमत्वाच्या तरुण भाजपा नेते असलेल्या ॲड. ज्ञायक पाटणी यांची निवड केली आहे.विशेष म्हणजे ही बाब कारंजा- मानोरा विधानसभा मतदार संघातील जनतेसाठी आनंदाची बाब आहे. ज्ञायक पाटणी यांची निवडीमुळे लाडकी बहिण योजना असो की अन्य योजना तथा समस्या संबंधी महिलांना मदत करणारा हक्काचा भाऊ मिळाला आहे. त्यामुळे ॲड. ज्ञायक राजेंद्र पाटणी यांचे जिल्ह्यातील लाडक्या बहिणी आणि दिवंगत आमदार स्व. राजेंद्र पाटणी यांना मानणाऱ्या हजारो कारंजेकराकडून अभिनंदन होत असल्याचे वृत्त संजय कडोळे यांना संजय भेंडे यांनी कळवीले आहे.

