prabodhini news logo
Home चंद्रपूर माईंड यूवर माईंड कार्यक्रमाचे रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर तर्फे यशस्वी आयोजन.

माईंड यूवर माईंड कार्यक्रमाचे रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर तर्फे यशस्वी आयोजन.

0
79

प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर – 30 ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.०० वाजता सरदार पटेल महाविद्यालयात निरोगी शरिरा करीता राखावयाची विविध सुत्र कसे जपावे व आपले शारीरीक स्वास्थ कसे चांगले ठेवावे ह्याबद्दल व्याख्यान रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर तर्फे आयोजित करण्यात आले होते.
रोजच्या धकाधकीच्या जिवनात पदोपदी अनेक प्रसंग येतात व त्यामुळे मुनुष्याच्या बुद्धीवर मानसिक ताण येतो. त्यामुळे साहजिकच मनुष्याची मानसीक स्थिती बदलते त्याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील कामावर होतो. अश्यावेळी आपण आपल्या रागावर, मनावर कसा ताबा ठेवायचा प्रयत्न करायचा ह्याच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या नागपूर वरून आलेल्या देवयानी शिरखेडकर ह्यांनी समजून सांगीतल्या.
देवयानी शिरखेडकर ह्या नागपूर च्या रोटरी क्लब ऑफ होराईजन च्या अध्यक्षा असून विविध विषयावर त्यांचा गाढ अभ्यास आहे. रोटरी सोबतच जेसीस संस्थेच्या त्या zone trainer आहेत.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्तविक रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे अध्यक्ष अजय पालारपवार ह्यांनी केले. देवयानी मॅडमचा परिचय रोटे. रविंद्र जुनारकर ह्यांनी करून दिला. कार्यक्रमाचा सुविचार मनिषा पडगीलवार हिने पठन केला. सदरील कार्यक्रमात रोटरीचे माजी अध्यक्ष विजय आईंचवार, मधुसुदन रुंगठा,रविंद्र जैन,प्रदीप बुक्कावार,अरुण तिखे, डॉ अशोक वासलवार, तसेच रोटरीचे विविध पदाधिकारी व सदस्य व नागपूर रोटरीचे माजी अध्यक्ष विवेक गारगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव मिलींद बोडखे ह्यांनी केले. सदर कार्यक्रमाला उपस्थित सर्व सदस्यांनी वरिल व्याखानाचा विशेष लाभ घेतला व पुढील वाटचालीत त्याचा उपयोग करून मानसीक तणावातून मुक्त होण्याचा मानस केला असे संस्थेचे सचिव कळवितात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here