
शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी, वाशिम – कारंजा लाड येथे 31,8,24 रोजी मुक मोर्चा आयोजन करण्यात आले आहे.देशात राज्यात महिला, छोट्या मुलींवर अगदी चिमुकल्या वर अत्याचार होत आहेत त्या विषयी निषेध व्यक्त करुन कठोर कायदे, कठोर कारवाई करावी यासाठी शासनाने पाऊले उचलली तर या पुढं अशी विकृत कृत घडणार नाही,
स्त्री शक्ती मंच संघटनेच्या वतीने स्त्री शक्ती मंच संघटना कार्यप्रमुख सौ शारदा अतुल भुयार याणी राष्ट्रपती मुख्यमंत्री, बालकल्याण विभाग वाशिम, मुख्य पोलिस स्टेशन कारंजा लाड, तहसीलदार झाल्टे सर यांना निवेदन देण्यात आले आहे.या नंतर अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी कायदा कठोर शिक्षा व्हावी दोषी ला त्वरित फाशी देण्यात यावी.या पुढं त्वरित दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले..
समाजात अतिशय भितीचे वातावरण निर्माण झाले असून ही चिंतेची बाब आहे यावर विचार करणे गरजेचे आहे.














