महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे
तिरुमलेश कंबलवार प्रतिनिधी गडचिरोली :- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अजून देखील महिला योजनेसाठी नोंदणी करत आहेत. आता नोंदणी करणाऱ्या महिलांना देखील याचा लाभ मिळणार असून या मिळणारी रक्कम ही कमी मिळणार असल्याची मोठी अपडेट समोर आली असून शिंदे गटातील मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरवात करत प्रत्येक महिलेला दार महिन्याला १५०० रुपये घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी करण्याची मुदत होती. ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे लाभ एकत्रित जमा झाले आहे. योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्याने उर्वरित महिलांनी देखील नोंदणी करण्यास सुरवात केली आहे. मात्र यापुढे नोंदणी करणाऱ्या महिलांना त्याच महिन्याचा लाभ मिळणार आहे.
ज्या महिन्यात नोंदणी त्याच महिन्याचा लाभ
१ सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचे लाभ मिळणार नाही. तर ज्या महिन्यात ते नोंदणी करणार त्याच महिन्याचे लाभ मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी गडचिरोली येथे दिली. लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून ही नोंदणी पुढेही कायम सुरूच राहणार आहे. मात्र ज्या महिन्यात नोंदणी होईल, त्याच महिन्यापासून त्या महिलेला लाभ मिळेल. आतापर्यंत ७० ते ७५ टक्के महिलांची नोंदणी झाली असल्याची माहितीही मंत्री तटकरे यांनी दिली.

