प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – साहित्य दर्पण कला मंच नागपूर, हा साहित्यीक समूह महाराष्ट्र राज्यात अव्वल स्थानावर असल्याचे समूहाचे संस्थापक प्रा.नानाजी रामटेके यांनी सांगितले आहे.
भारत देश हा कृषिप्रधान देश असून येथील मुख्य व्यवसाय शेती आहे.भारतीय संस्कृतीत बैलपोळा या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.या सणाचे महत्त्व लक्षात घेता दिनांक ०२ सप्टेंबर ०३ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित चित्रकाव्य ( बैलपोळा ) या चित्रावर आधारित समूहात उपक्रम विषय आयोजित केला होता. यात महाराष्ट्र राज्यात कानाकोपऱ्यातून आणि त्यापलीकडे गोवा राज्यातून अनेक कवी कवयित्री यांनी सहभाग नोंदविला असून त्यात लक्षणीय प्रतिसाद मिळाला.जवळपास १४६ साहित्यिकांनी आपली रचना सादर केलीत.आणि उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी उपक्रम निर्धारित वेळेच्या आत रचनांचे शतक पूर्ण झाले असून त्याच दिवशी १०९ रचना आल्यात या द्विदिवसीय उपक्रमात एकूण १४६ साहित्यिकांनी आपल्या मनातील काव्यरचना समूहात सादर केल्या असून साहित्य दर्पण या समूहाच्या इतिहासातील ही पहिलीच विक्रमी नोंद असल्याचे प्रा.नानाजी रामटेके यांनी सांगितले.
जवळपास दोन वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या साहित्य समूहाने अल्पावधीत महाराष्ट्र राज्यात नेत्रदीपक यश मिळवले आहे.यात समूह समूह प्रमुखांचा प्रेमळ स्वभाव,आपुलकी जिव्हाळा या सर्व गुणांनी त्यांनी साहित्यिकांचे मन जिंकून घेतले असून हा समूह साहित्यिकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.या समूहाने नवोदित कवी कवयित्री यांच्या लेखणीला वाव मिळावा म्हणून दररोज काव्याच्या अनेक प्रकारावर आधारित उपक्रम विषय राबविण्यात येत असतात.समूहात आलेल्या रचनांचे वाचन करून त्या रचनांना योग्य तो अभिप्राय देण्याचे आणि चुका आढळल्यास त्यांची दुरुस्ती करण्याचे समूह संस्थापिका कल्पना टेंभूर्णीकर आणि समूह संस्थापक प्रा नानाजी रामटेके हे नवोदित साहित्यिकांना सुचवीत असतात यामुळे त्यांना परत आपली रचना दुरुस्त करून लिहिण्याची प्रेरणा मिळत असते.या समूहात अनेक साहित्यिक सामील झाले असून हा समूह नसून तो एक साहित्य दर्पण परीवार असल्याचे अनेकांनी आपले मत दर्शविले आहे.खरे म्हणजे या समूहाच्या माध्यमातून नवोदित कवी कवयित्री यांना एक व्यासपीठ मिळवून दिले आहे.
यामध्ये साहित्यिकांनी आपला लक्षणीय सहभाग नोंदविल्याने राज्याच्या अनेक भागातील मान्यवर साहित्यिकांनी साहित्य दर्पण समूहाचे अभिनंदन तसेच कौतुक करताना आपल्या भावी उन्नतीसाठी शुभेच्या व्यक्त केल्या असून यामध्ये प्रामुख्याने डॉ.मधुकर दिवेकर यांनी वन डे मधील विक्रम मोडणारे विक्रमवीर, विक्रमशिल व सदैव कार्यशिल अभिनंदन गौरवशाली व्हॉट्सॲपच्या इतिहासातील ‘सुवर्णपान” म्हणजे प्रा. नानाजी रामटेके. असे मत त्यांनी व्यक्त केले.आयु.राजाराम भीमराव कांबळे यांनी प्रा.नानाजी रामटेके तुमच्यातील इच्छाशक्तीला साहित्य प्रती असणाऱ्या तुमच्या निष्ठेला आणि या साहित्य समूहातील प्रत्येकाच्या लिहिते करण्याच्या तुमच्या प्रतिभेला यश प्राप्त झाले आहे असे त्यांनी आपले मत व्यक्त केले.
गायकवाड मनोज रामचंद्र यांनी आपल्या कवितेच्या कला मंचावर मनातील भावना प्रतीक्षा उतरल्या आणि बघता बघता त्यांनी शतकही पार केले. उत्स्फूर्ततता ही कवीची जन्मजात शैली असते आणि त्याचाच प्रत्यय सत्यात उतरला आहे असे त्यांनी आपले मत व्यक्त केले. प्रा.शरदचंद्र काकडेदेशमुख यांनी प्राध्यापक नानाजी रामटेके सरांचे साहित्यिकांना देत असलेले प्रोत्साहन अनुभवले आणि बारा हत्तीचे बळ माझ्या मनगटात आले असे ते म्हणाले.श्री.मधुकर शहारे सर म्हणाले की, एका दिवशी कमी कालावधीत शतकपूर्ती होणे ही गौरवशाली बाब असल्याचे त्यांनी सांगितले.फुलावती काटे यांनी समूहाच्या बाबतीत प्रा.नानाजी रामटेके आणि कल्पना टेंभूर्णीकर समूहात जातीने लक्ष देऊन समूह चालवितात यांच्याच कार्याची पावती म्हणजे हा समूह अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
छाया जांभूळे यांनी साहित्य दर्पण समूह म्हणजे निर्धारित वेळेपूर्वी शतकपूर्तीचा कोसळणारा धबधबा आहे. हे विलोभनीय दृश्य साकारण्याचे काम प्रा. नानाजी रामटेके आणि कल्पना टेंभुर्णीकर यांनी केले आहे केले असे मत त्यांनी समूहाप्रती व्यक्त केले.प्रा.हंसराज रंगारी यांनी समूहाच्या वाटचालीत आपले मत व्यक्त करताना सांगितले की, एकाच दिवशी निर्धारित वेळेच्या पूर्वी समूहात १०९ रचना येणे यात समूह संस्थापकांचा सिंहाचा वाटा आहे तसेच समूहाने आत्मविश्वास, मेहनत ,जिद्द आणि स्वप्न बाळगून केलेले कष्ट फळाला आले आहे असे मत व्यक्त केले.समाधान दिनकर लोणकर यांनी आपली प्रतिक्रिया नोंदविताना असे सांगितले की, साहित्य दर्पण साहित्याला राज्यात लक्षवेधी ठरणार आहे.भविष्यात साहित्य क्षेत्रामध्ये एक नामांकित परिवार म्हणून आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले जाईल यात काही शंका नाही असे त्यांनी आपले मत व्यक्त केले.लेखिका रजिता रविन्द्र चव्हाण यांनी प्रा.नानाजी रामटेके यांनी आपल्या सर्वांनी साहित्यिकांना आपल्या प्रेमळ स्वभावाने सर्वांना एका माळेमध्ये गुंफून ठेवले आहे असे आपले मत व्यक्त केले.
मधुकर गोपनारायण यांनी समूहाच्या वाटचालीच्या बाबतीत या समूहाचे नेत्रदीपक यश म्हणजे समूह संस्थापक व संस्थापिका यांच्या तळमळीने केलेल्या मेहनतीची परिमिती आहे.रेखा मालपुरे यांनी या समूहात लेखन करण्यासाठी साहित्यिकांना लेखन करण्यासाठी उत्साह वाढवीत असल्याचे आपले मत व्यक्त केले.रेखा डायस यांनी वेळेत रचनांना अभिप्राय आणि सन्मानपत्र देण्याचे काम फक्त याच साहित्य समूहात देत असल्याचे सांगितले.
सुनंदा वाळुंज यांनी सांगितले आहे की,प्रा.नानाजी रामटेके यांनी स्वतः ला समूहाप्रती झोकून दिले आहे तर सुनंदा मधुकर अंभोरे यांनी यात साहित्यिकांना प्रोत्साहन आणि लगेच चुका आढळल्यास त्यांना दुरुस्त करण्याचे सांगितले जाते. आशा नष्टे यांनी या समूहात सन्मानपत्र देण्याची त्वरित सेवा आणि समूहाविषयी जागरूकता हेच या समूहाच्या प्रगतीचे रहस्य आहे असे सांगितले.तसेच आशा फुल्लुके यांनी प्रा.रामटेके सर केवळ आपल्या प्रतिसादामुळे आमच्या लेखणीला खरचं बळ मिळते आणि ते म्हणजे आपल्या पाठीवरच्या थापेमुळेच असे मत व्यक्त केले.प्रा.डॉ.इंद्रकला बोपचे यांनी या समूहात स्तुत्य उपक्रम राबविले जातात आणि सर्वांच्या रचनेला साद प्रतिसाद व प्रतिक्रिया देण्याचे काम प्रा नानाजी रामटेके सरांच्या हातून घडत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा.सुरेखा अशोक जोगदे यांनी साहित्यिकांना प्रोत्साहित करण्यासाठी लगेच सुंदर शब्दात अभिप्राय व कामाची एकनिष्ठा प्रा.रामटेके सरांच्या अंगी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.जयद्रथ आखाडे यांनी साहित्यिकांना आनंद वातावरणात लिखाणाची गोडी निर्माण करणारा एकमेव समूह म्हणजे साहित्य दर्पण समूह होय असे आपले मत व्यक्त केले.तर उषा धांडे यांनी कवितेला लगेच प्रतिसाद मिळत असल्याने समूहात साहित्यिकांची संख्या वाढत असल्याचे सांगितले. पूजा सोनार यांनी प्रा.नानाजी रामटेके म्हणजे या समूहात लाभलेले एक दैवत आहेत असे त्यांनी आपले मत व्यक्त केले.प्रा.रत्नाकर सुखदेवे यांनी कवी लेखकांच्या प्रतिभा या समूहात फुलविल्या जातात.तर आयु.राजाराम भीमराव कांबळे यांनी या समूहात डोळ्याच्या पापण्या लवण्याचे काम होत नाही तर प्रा.रामटेके सर सन्मानपत्र देतात असे मत त्यांनी व्यक्त केले.आणि सर्व साहित्यिकांनी भावी उन्नतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या सर्व साहित्यिकांचे आभार कल्पना टेंभूर्णीकर समूह संस्थापिका ,प्रा.नानाजी रामटेके समूह संस्थापक,वैशाली खंडारे समूह प्रशासिका, माला मेश्राम समूह प्रशासिका,हरिश्चंद्र धिवार समूह मार्गदर्शक यांनी मानले.

