मा.खा.अशोक नेते यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन नरेगा आयुक्त व सीईओ शी केली चर्चा.
सात वर्षांपासून कुशल कामाचे देयके रखडले देयके व्याजासह देण्याच्या मागणीसाठी पुरवठा धारकांनी सूरु केले होते आमरण उपोषण
आरमोरी प्रतिनिधी :- आज दिं. ११ सप्टेंबर २०२४ तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये सन- २०१६-१७ मध्ये नरेगा अंतर्गत आरमोरी तालुक्यातील ग्रामपंचायतीला साहित्य पुरवठा करणाऱ्या पुरवठा धारकाचे कुशल कामाचे देयके देण्यात आली नाही. त्यामुळे साहित्य पुरवठा धारक आर्थिक संकटात सापडले आहेत. थकीत देयके मिळण्यासाठी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करुनही ते मिळाले नाही. त्यामुळे हताश झालेले साहित्य पुरवठा धारक संजय चरडुके व योगेंद्र सेलोटे यानी उपोषणाचा मार्ग पत्करून आरमोरी पंचायत समिती समोर २१ आगस्ट पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.
दरम्यान माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री श्री.अशोकजी नेते यांनी (दिं.१० सप्टेंबरला) मंगळवारी उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषण कर्त्याच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या. व उपोषण मंडपातून नरेगाचे नागपुर येथील आयुक्त गुल्हाने साहेब व गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.आयुषी सिंह यांच्याशी फोनवरून चर्चा केली तेव्हा रखडलेली देयके त्वरित देण्यात येईल व उर्वरित झालेल्या कामाचे रेकॉर्ड करून एम आय एस आणि एफ टी ओ करून निधी देण्याचें व ज्या अधिकाऱ्यांनी चुकी केली त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्याने माजी खासदार अशोक नेते यांच्या शिष्टाईने उपोषणकर्त्यांनी २१ व्या दिवशी आपले उपोषण मागे घेतले.
यावेळी माजी खासदार अशोक नेते यांनी उपोषणकर्ते संजय चरडुके व योगेंद्र सेलोटे यांना लिंबू पाणी देऊन उपोषण सोडविले. मात्र येथे आठ दहा दिवसात जर कुशल कामाचे थकलेले देयके मिळाली नाही तर पुन्हा उपोषणाला बसण्याच्या इशारा उपोषणकर्त्यांनी यावेळी दिला.
उपोषण सोडतेवेळी आरमोरी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी मंगेश आरेवार,भाजपा जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे, माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे, भाजपा तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, जिल्हा सचिव नंदू पेट्टेवार,माजी नगरपरिषद सभापती तथा भाजयुमो जिल्हा महामंत्री भारत बावनथडे, शहराध्यक्ष विलास पारधी, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय हेमके,मनोज पांचलवार, विकास पायदलवार,संगमवार आदी उपस्थित होते.

