prabodhini news logo
Home चंद्रपूर जनता महाविद्यालय चंद्रपूर गृह अर्थशास्त्र विभागातर्फे “राष्ट्रीय पोषण सप्ताह” सॅलेड सजावट स्पर्धा...

जनता महाविद्यालय चंद्रपूर गृह अर्थशास्त्र विभागातर्फे “राष्ट्रीय पोषण सप्ताह” सॅलेड सजावट स्पर्धा यांचे आयोजन

0
291

सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक, चंद्रपूर- चंद्रपूर येथील चांदा शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित जनता महाविद्यालय चंद्रपूर येथील गृहअर्थशास्त्र विभागा तर्फे सॅलेड सजावट स्पर्धेचे आयोजन गुरुवार दिनांक १२ सप्टेंबर २०२४ ला घेण्यात आले. या स्पर्धेला संस्थेचे सचिव माननीय डॉ.अशोक जिवतोडे व प्राचार्य डॉ. एम.सुभाष सर यांचे मार्गदर्शन लाभले .या स्पर्धेत जनता महाविद्यालयाचे, मानव्य शास्त्राचे उपप्राचार्य डॉ. ए. के. महातळे, संगणक विभाग प्रमुख डॉ.जीवतोडे, मराठी विभाग प्रमुख डॉ.जे.एल. पायघन आणि स्पर्धेचे परिक्षक जनता महाविद्यालयाचे रसायन विभागाचे डॉ. मनीषा महातळे मंचावर उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाले या स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार बी.ए . भाग-1 वर्षाची बिंदिया आसुटकर, द्वितीय पुरस्कार बी.ए . भाग – 1 वर्षाची भारती सोयाम, तृतीय पुरस्कार बी .ए . भाग- 1 वर्षाची करिशमा काकडे यांचे सत्कार हॅडमेड फ्लावर , सर्टिफिकेट आणि रोख रक्कम देण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष व कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. ए .के . महातळे आणि संगणक विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एम .जीवतोडे यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. तसेच सॅलेड सजावट स्पर्धेचे परिक्षक जनता महाविद्यालयात रसायन विभागाचे डॉ. मनीषा महातळे यांनी विद्यार्थींनीनीचे सॅलेड सजावट स्पर्धेचे परिक्षण केले व त्यांचे महत्त्व पटवून दिले. तसेच , डॉ. ज्योति पायघन, कार्यक्रमा मध्ये उपस्थित होते. या स्पर्धेचे सूत्रसंचालन बी.ए प्रथम वर्षाची समीक्षा कडूकर आणि प्रास्ताविक गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कीती वर्मा यांनी सांगितले की सॅलेड हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा घटक आहे तो फक्त पौष्टिकतेने भरलेल्या नसतो तर तो आपले आरोग्य सुधारण्या देखील मदत करतो. पण सॅलेड खाण्याची एक कला आहे तो म्हणजे सॅलेड सजावट सॅलेड सजवताना आपण आपल्या कल्पकतेचा वापर करतो त्यामुळे वेगवेगळ्या भाज्यांचे , वेगवेगळ्या फळाचे आणि ड्रेसिंगच्या योग्य वापर करून सॅलडला आकर्षक बनवू शकतो. असे सांगण्यात आले . आभार बी.ए. द्वितीय वर्षाची कु.ज्ञानेश्वरी आत्राम यांनी मानले. करुणा मानकर व नेवारे यांनी सहकार्य .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here