नामदेव निर्मळे शिरोळी प्रतिनिधी- टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील सामाजिक बांधिलकी नेहमी जपता असणारे नावलौकिक असलेले मंडळ म्हणजे श्री लोकमान्य तरुण मंडळ नेहमी सामाजिक बांधिलकी जपत आलेली आहे. मुसलमान धर्माच्या नागरिकांना सुद्धा आरतीचं मान दिला जातो हे या मंडळाचे व गावातील वैशिष्ट्य आहे.
या मंडळाची स्थापना 1992 यावर्षी झाली असून या मंडळाला 2022 रोजी कुरुंदवाड पोलीस स्टेशन मार्फत गणराया अवार्ड देण्यात आलेला आहे.
लोकमान्य तरुण मंडळामध्ये सर्व जाती-धर्माचे नागरिक आहेत. जातीपाती ला थारा न देता सर्वांना एकत्र पुढे घेऊन जाण्याचा वसा घेतलेल मंडळ प्रचलित झाली आहे.
ना कोणता गर्व ना कोणता मोठेपणा या मंडळाचे वैशिष्ट्य आहे.
यापूर्वी अनेक नाटीकरण करून समाजप्रबोधनाचे काम या मंडळांनी केलेले आहे. हे मंडळ नेहमी चर्चेत असतं.

