गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रबोधन आणि संस्कार होण्याची आवश्यकता.- लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे

0
117

लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – गणेशोत्सवाची सुरुवात ही समाजजागृती आणि लोकप्रबोधन करण्याच्या उद्देशाने झालेली आहे. आज सुद्धा या गणेशोत्सवाच्या माध्यमातूनच समाज प्रबोधन आणि संस्कार होण्याची अत्यंत गरज असल्याचे विचार लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी याप्रसंगी बोलताना मांडले.
दिनांक १२ सप्टेंबर २०२४ वार गुरुवार रोजी रात्री ८ वाजता हरंगुळ (बु.) येथील सार्वजनिक श्री. गणेश मंदिर, विठ्ठल नगर येथे विठ्ठल साई मित्र मंडळाच्या वतीने प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणरायाची आरती लोकाधिकारप्रमुख मा. श्री. व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते करण्यात आली.
आरती झाल्यानंतर उपस्थित सर्वांना लोकाधिकारप्रमुख मा. श्री. व्यंकटराव पनाळे यांनी गणेशोत्सवाचे महत्व आणि हिंदू समाजाने घ्यावयाची काळजी या विषयावर प्रबोधन केले.
गणेश मंडळाच्या वतीने मा. श्री. व्यंकटराव पनाळे आणि संतोष पनाळे यांचा शाल, पुष्पहार, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी गणेश मंडळाचे नामदेवराव पोफळे, हणमंतराव कदम, अनिलराव जाधव, शंकरराव पवार, अशोकराव कळसे, अंकुश कोल्हापुरे, प्रदीपकुमार बिडवे, अजय काळसे, गजानन कुलकर्णी, शैलेश पवार, आदित्य काळसे, ईश्वर पोफळे, संस्कार पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विठ्ठल नगर परिसरातील माता-भगिनी, युवक, बाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here