भयमुक्त जीवन जगा ईश्वराशिवाय तुम्हाला कोणीही ईजा करू शकत नाही

0
166

सिरतुन्न नबी जलसा मध्ये पी एम मुजम्मिल साहब यांचे मार्गदर्शन.

लक्ष्मण कांबळे औसा प्रतिनिधी:-  औसा.दि.13 शहरातील आझाद चौक येथे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या ईद ए मिलादुन्नबी निमित्त ता.12 रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये कर्नाटकातील मौलाना पी एम मुज्जमील साहब यांनी मार्गदर्शन केले.
मजलिसे उलेमा औसा व स्थानिक नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करताना मौलानांनी प्रेषितांनी सांगितलेल्या मार्गावर कसे चालावे या संबंधी मार्गदर्शन केले.
जीवन जगत असताना आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये तसेच गोरगरीबांना चांगले जीवन मिळावे यासाठी प्रयत्न करावे .देशात शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करावेत. कोणी जाणून बुजून त्रास देत असेल तर अशांना योग्य उत्तरे दिली पाहिजेत असेही त्यांनी पुढे सांगितले. भयमुक्त जीवन जगा शेवटी तुम्हाला मृत्यू येणारच आहे. तुमच्यासाठी हे जग नश्वर आहे तुम्हाला जन्नत मध्ये कायमस्वरूपी राहायचे आहे. तर या जगात भीती बाळगून जगू नका तर ताट मानेने ,स्वाभिमानाने जगा अशा प्रकारचे उपदेश या ठिकाणी जमलेल्या हजारो भाविकांना त्यांनी केले. यावेळी या ठिकाणी चौकात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. पोलीस प्रशासनासह या ठिकाणच्या युवकांनी योग्य तो बंदोबस्त ठेवला होता.
अत्यंत व्यस्त असलेल्या वेळेतून वेळ काढून सकाळपासून वेगवेगळ्या ठिकाणी मौलानांनी मार्गदर्शनपर भाषणे केली.यात त्यांनी प्रेषितांसंदर्भात सविस्तर माहिती दिली. प्रेषितांनी जनतेसोबत कशा प्रकारचा व्यवहार केला या बाबी सविस्तरपणे नागरिकांना सांगितले.शेवटी
मौलाना कलीमुल्ला यांनी उपस्थित नागरिकांचे व मौलाना पी एम मुज्जमील साहब यांचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here