पिक विम्याच्या नुकसान भरपाई पासुन शेतकरी वंचित

0
141

२०२३-२०२४ पिक विमा काढला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले अजूनही नुकसान भरपाई मिळाली नाही

शेतकऱ्यांनाना नुकसान भरपाई त्वरीत द्या – शुभम गजभिये

उपक्षम रामटेके चिमूर प्रतिनिधी – तालुक्यात २०२३ – २०२४ या कालावधीत खरीप हंगामात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान केले.शेतकऱ्यांनी पिक विमा काढला नुकसानीची माहिती विमा कंपनीला दिली. शासनाकडून शेतकऱ्यांना आश्र्वासन देण्यात आले नुकसान भरपाई मिळणार म्हणून अजुनही नुकसान भरपाई मिळाली नाही तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शुभम गजभिये यांनी केली आहे.

शेतकरी दरवर्षी मोठ्या आशेने पिकविमा भरतोय.परतु शेतकऱ्यांचे नुकसान होवुनही वेळेत शेतकऱ्यांना पिक विम्याच्या फायदा होताना दिसत नाही. अनेक शेतकरी मात्र पीक विम्यापासून वंचित राहत आहे. पिक विमा काढूनही नुकसान झाले तर शेतकऱ्यांना विमा मिळत नाही परंतु पीक विमा कंपन्यांचे चांगभलं होत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अतिशय गंभीर बिकट होत चालली आहे.या गंभीर बाबीकडे सरकारने लक्ष देऊन शेतकऱ्यांना
लवकरात लवकर पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावेत अशी मागणी युवक काँग्रेस कार्यकर्ते शुभम गजभिये यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here