किशोर मडगूलवार जिल्हा संपादक चंद्रपूर– आज २१ सप्टेंबर १९९५ ला गणपती दुध पित असलेल्या तथाकथित चमत्काराबद्दलच्या घटनेचा भांडाफोड महाराष्ट्र अंनिसने केला तेव्हापासून महाराष्ट्र अंनिसच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर २१ सप्टेंबर हा चमत्कार सत्यशोधन दिन म्हणून साजरा केला जात आहे. त्या अनुषंगाने डॉ पंजाबराव देशमुख विद्यालय चंद्रपूर येथे महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष पी. एम. जाधव यांचा चमत्कार सादरीकरणाचा कार्यक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. के. वाढई यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.या प्रसंगी विज्ञान व गणितावर आधारित चमत्कारिक प्रयोगांचे सादरीकरण करून त्या मागील विज्ञान किंवा तंत्र शोधून काढणाऱ्या विद्यार्थ्यांस महाराष्ट्र अंनिस चंद्रपूर कडून बक्षीस दिले जाईल असे जाधव यांनी सांगितले. या कार्यक्रमाला शिक्षक ए.एल.देवतळे, महेंद्र राळे, आर. व्ही. धोटे, टी. जी. पाल यांनी सहकार्य केले.

