जागतिक पोषण आहार माह मध्ये शालेय मुलांना व मुलींना मार्गदर्शन

0
45

वंदना विनोद बरडे अधीसेवीका उपजिल्हा रूग्णालय वरोरा

वरोरा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – आज दिनांक २३ सप्टेंबर २०२४ ला लोकमान्य टिळक शाळेच्या मुला मुलींना पोषण आहार माह निमित्ताने वंदना विनोद बरडे अधीसेवीका ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी मार्गदर्शन केले.या पोषण आहार माहचे काय महत्त्व आहे हे समजावून सांगितले.कोणते पदार्थ घ्यायला पाहिजे कोणते नाही याचे मार्गदर्शन केले.आदर्श जिवन शैली आणि पोषण आहार यांचा संबंध समजावून सांगितले व त्याचा आपल्या जीवनात कसा फायदा होतो हे समजावून सांगितले आजची मुलं ही होणारी भावी पीढी आहे तर ती सुशिक्षित, हुशार, सूद्रूढ निरोगी असायला पाहिजे तर मग आदर्श जिवन शैली आणि समतोल ,सकस व चौरस आहार असायला पाहिजे. याविषयी मार्गदर्शन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here