गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दिं. २५ सप्टेंबर ला माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या विशेष प्रयत्नांच्या पुढाकारानं विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेश्वर मंदिर देवस्थानचे विकास काम मार्गी लागले.या अनुषंगाने आज दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोज बुधवारी दु.२.०० वा. पुरातत्त्व विभागाचे अधिक्षक मान. अरुणजी मलिक जी तसेच पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह मार्कंडश्वर मंदिराच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करुन आढावा घेण्यात येत आहे.
तरी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मा.खा.नेते यांनी या प्रसंगी केले आहे.

